पुणे (पंढरी गायकवाड) – हो मी पोलीस आहे, प्रत्येक क्षण जिव माझा ओलीस आहे, घर दार नाही मला, नाती गोती नाहीत, क्षणाचा नाही विसावा, मी असतो सदा घाईत, सुख असो दुःख असो मी फ़क्त ड्युटी करतो,उद्या तरी घरी असेल याच आशेवर पोट भरतो, आई बाप माझे घरी वाट पाहतात, गाडीचा येता आवाज मुले दाराकड़े धावतात, लक्ष्मी पुजनाला घरच्या लक्ष्मी सोबत नसतो, रस्त्यावर उभा राहून मी स्वतः वरच हसतो, शहर भर जेंव्हा सुरु असतात दंगे, आम्ही सारे पोलीस बांधव असतो एकमेकांच्या संगे, लोकांची घरे वाचवण्यासाठी, करतो जिवाचे रान, हळूच तेंव्हा आमच्या घराचे येती मनी हो ध्यान, नसों कोणाला कदर आमची नसों कोणाला जाण, ही माती आमची माता ही वर्दी आमची शान…जय हिंद-जय भारत…!
अशी शब्दरचना जी विचार करायला भाग पाडते, खरोखरच पोलिस बांधव जीवच रान करून परिवाराला सोडून जनतेचे रक्षण करण्यासाठी रस्त्यावर अहोरात्र उभा असतो म्हणून आम्ही सर्व नागरिकांना आव्हान करतो की पोलीस प्रशासनाला सहकार्य करा कायदा सुव्यवस्था पाळा, शासनाच्या नियमांचे पालन करून कोरोनाला हद्दपार करा







