धरणगाव (प्रा.पी.एम.पाटील) – जळगाव जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रकल्प बाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी सोबत जलसंपदा मंत्री मा.ना.श्री.जयंत पाटील यांच्या दालनात दुपारी एक वाजता मुंबई येथे बैठक संपन्न झाली त्यात पाडळसरे धरण यासह उपेक्षित प्रलंबित योजनांबाबत चर्चा करण्यात आली.
बैठकीस उपस्थित राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व माजी मुख्यमंत्री मा.ना.श्री.अशोक चव्हाण साहेब, जलसंपदा मंत्री मा.ना.श्री.जयंत पाटील साहेब, पाणीपुरवठा मंत्री व पालकमंत्री जळगाव जिल्हा मा.ना.श्री.गुलाबराव पाटील साहेब, अमळनेर मतदारसंघाचे आमदार अनिल भाईदास पाटील, चोपडा मतदारसंघाचे आमदार सौ.लताताई सोनवणे,माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे, आमदार डॉ.किरण लहामटे, संजय घाणेकर सचिव जलसंपदा, आर.आर.पवार सचिव(लाभक्षेत्र), व्ही.डी.पाटील सल्लागार तापी महामंडळ सोबत विभागाचे अधिकारी वर्ग.







