वैद्यकीय प्रवेश परीक्षा होणार १२ सप्टेंबरला : आजपासून फॉर्म भरता येणार

नवी दिल्ली : वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीट (नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट) येत्या १२ सप्टेंबर रोजी होणार आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी याबाबत माहिती दिली.

आज (१३ जुलै) संध्याकाळी पाच वाजल्यापासून NTA (National Testing Agency) वेबसाईटवर प्रवेश परीक्षा प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षेदरम्यान सुरक्षित अंतर असावे यासाठी परीक्षा घेण्यात येणाऱ्या शहरांची संख्या १५५ वरुन १९८ पर्यंत वाढवण्यात आली आहे. तर परीक्षा केद्रांमध्येसुद्धा वाढ करण्यात आली आहे.

नीट ही प्रवेश परीक्षा एमबीबीएस, बीडीएस, आयुष आणि पशु वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी घेतली जाते. महाराष्ट्रात साडेसहा हजार प्रवेशांच्या जागांसाठी सुमारे दीड लाख विद्यार्थी स्पर्धेत असतात. नीट या एन्ट्रास परीक्षेच्या गुणवत्तेच्या आधारावर देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश होत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी नीटचं रँकिंग अत्यंत महत्त्वाचं असतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here