बीएचआर घोटाळा : सर्व ११ संशयितांना जामीन मंजूर; मॅचिंग पावत्यांची २० टक्के रक्कम भरण्याची अट

bhr

जळगाव (जळगाव जिल्हा निलेश पाटील) : बीएचआर घोटाळ्यात मागील महिन्यात अटक करण्यात आलेल्या सर्व अकरा संशयित आरोपींचा आज न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. दरम्यान, एक लाखाच्या वैयक्तिक जातमुचलका तसेच पावत्या मॅचिंग केल्याच्या २० टक्के रक्कम दहा दिवसाच्या आत भरण्यासह इतर अटीं न्यायालयाने संशयितांना घातल्या आहेत.

बीएचआर घोटाळ्यात मागील महिन्याच्या २७ तारखेला पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने राज्यातील विविध भागात धाडसत्र टाकून तब्बल अकरा संशयित आरोपींना अटक केली होती. या सर्वांच्या जामीन अर्जावर पुणे न्यायालयात काही दिवसांपासून सुनवाई सुरू होती. दरम्यान, सर्व आरोपींनी त्यांच्याकडे पावत्या मॅचिंग केल्याची निघणारी अपहाराची रक्कम न्यायालयात भरण्यास तयार असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्यानुसार न्यायालयाने आज सर्व आरोपींना त्यांच्याकडे निघणाऱ्या रकमेची माहिती देत दहा दिवसाच्या आत यातील २० टक्के रक्कम जमा करण्याचे निर्देश दिले. तसेच प्रत्येकी एक लाखाच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. दरम्यान सर्व संशयितांना आता दहा दिवसाच्या आत २० टक्के रक्कम न्यायालयात भरावी लागणार आहे.

भागवत भंगाळे (जळगाव), छगन झाल्टे (जामनेर), जितेंद्र रमेश पाटील (जामनेर), आसिफ मुन्ना तेली (भुसावळ), जयश्री शैलेश मणियार (जळगाव), संजय तोतला (जळगाव), राजेश लोढा (जामनेर), प्रीतेश चंपालाल जैन (धुळे), अंबादास आबाजी मानकापे (औरंगाबाद), जयश्री अंतिम तोतला (मुंबई) आणि प्रेम नारायण कोगटा (जळगाव) यांचा जामीन मंजूर झाला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here