दक्षिण आफ्रिकेत युद्धजन्य परिस्थिती; जाळपोळ, लुटपाट, हिंसाचारात ७२ ठार

जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेत हिंसाचार उफाळला असून युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. माजी राष्ट्रपती जेकब झुमा यांची तुरुंगात रवानगी केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर हिंसाचार, तोडफोड आणि लुटपाट सुरू आहे.

हिंसाचार रोखण्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. मात्र, तरीही हिंसाचाराच्या घटना सुरू आहेत. मंगळवारी झुमा समर्थकांनी काही शॉपिंग मॉलला आग लावली. मागील पाच दिवसांपासून सुरू असलेल्या हिंसाचारात आतापर्यंत ७२ जण ठार झाले आहेत. तर, शेकडोजणांना अटक करण्यात आली आहे.

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, दक्षिण आफ्रिकेत मागील काही दशकांमधील हा मोठा हिंसाचार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झुमा यांना अटक केल्यानंतर सुरू झालेल्या आंदोलनानंतर आतापर्यंत ७२ जण ठार झाली आहेत. यापैकी बहुतांशी जण दुकानात सुरू असलेल्या लुटपाटी दरम्यानच्या चेंगराचेंगरीत ठार झाले आहेत. सर्वाधिक हिंसाचार हा गाउतेंग आणि क्वाझुलू नाताळ या प्रांतात सुरू आहे. हिंसाचार झालेल्या भागांमध्ये पोलीस आणि लष्कर शांततेचे प्रयत्न करत आहेत.



LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here