मेदनकर वाडी चाकण येथे खूनाचा गुन्हा १२ तासाच्या आत उघडकीस

पुणे (बाजीराव नाईक) – २६ जुलैला सायंकाळी ७ च्या सुमारास राजेंद्र जालिंदर काळे (वय ३६, रा.सिध्दीविनायकनगर, मेदनकरवाडी, ता.खेड, जि.पुणे) यांचेवर मोटारसायकलवरून आलेल्या तीन अनोळखी इसमांनी बोरजाईनगर चौक येथे येवून त्यांच्यावर कोयत्याने हल्ला करुन गंभीर जखमी करुन पळून गेले. या हल्ल्याची खबर राजेंद्र काळे यांची पत्नी सोनाली काळे यांनी चाकण पोलीस स्टेशनला दिल्यानुसार चाकण पोलीस स्टेशन गुरनं ८५५/२०२० भादविक ३०२, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेची खबर मिळताच चाकण पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी, गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ तपासाकरिता विशेष पथके तयार करून रवाना करण्यात आली. त्यांना मिळालेल्या माहितीनुसार राजेंद्र काळे यांच्यावर हल्ला करणारे तीन विधीसंघर्षित बालकांपैकी दोघांना गुन्हे प्रकटीकरण पथकातील सहा.पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड व त्यांच्या पथकातील पो.ना.संजय जरे, पो.ना.विरसेन गायकवाड, पो.शि.मनोज साबळे, पो.शि.प्रदीप राळे यांनी कडाचीवाडी, ता.खेड येथील पी.के. कॉलेजजवळ तसेच तिसऱ्या विधीसंघर्षित बालकास गुन्हे शाखा युनिट १ चे पो.ना. सावंत यांनी ताब्यात घेतले. या तिघांकडून गुन्ह्यातील वापरलेल शस्त्रे व वाहन हस्तगत करण्यात आले. त्यांना बालन्यायालय येरवडा येथे हजर केलेले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त स्मिता पाटील, सहा.पोलीस आयुक्त राम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश धस, सहा.पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक विशाल दांडगे, पोलीस उपनिरीक्षक विजय जगदाळे, पो.ह.सुरेश हिंगे, पो.ना.संजय जरे, अनिल गोरड, बापू सोनवणे, हनुमंत कांबळे, वीरसेन गायकवाड, पो.शि. पाषाणकर, पो.काँ. प्रदीप राळे, मनोज साबळे, नितीन गुंजाळ, निखील वर्पे, अशोक दिवटे, मच्छिंद्र भांबुरे यांनी केली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल दांडगे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here