दोंडाईचा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे दहावी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

दोंडाईचा (संतोष कोळी) – इयत्ता १० वी च्या परीक्षेत दोंडाईचा शहरातील विद्यार्थी-विद्यार्थीनींनी उत्तम गुणांसह प्राविण्य मिळविले.यशस्वी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढावे आणि भावी शैक्षणिक जिवनात त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने दोंडाईचा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने शहरातील यशस्वी विद्यार्थ्यांपैकी प्रथम पाच विद्यार्थी-विद्यार्थिनी कृतिका बोरसे,वैष्णवी हजारे,रोशनी चौधरी,प्रफुल पाटील,देवयानी राजपुत यांना सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देवून गौरविण्यात आले.
याप्रसंगी शहर राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख अॅड एकनाथ भावसार, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष श्री मयुर बोरसे,विद्यार्थी शहराध्यक्ष संजोग राजपुत,राजेंद्र देशमुख,श्री.नरेंद्र पाटील,दादाभाई कापुरे,रईस बागवान,मनोज देशमुख, प्रसाद गिते,बिलाल बागवान,छोटू सैंदाणे,निखिल पाटील,मुन्ना खाटीक,कुंदन जाधव,हरीष चौधरी,विवेक नंदाळे,गिरीष पाटील,प्रतिक मोरे,मोहित पाटील आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here