डॉ. दिनेश वर्मा यांना मारहाण प्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करा – डॉ.अभिजीत सायंबर

बीड (सुमित निसर्गध) – राज्यात सध्या कोरोनाचे संकट उभे असताना स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णांना त्यांच्या कोरोना रोगापासून मुक्त करून जीव वाचवणारा डॉक्टरावरच आता सध्या हल्ले होत असून लातूर येथील डॉ. दिनेश वर्मा यांना मारहाण केल्याप्रकरणी मारहाणीची तात्काळ चौकशी करून आरोपींना अटक करावी अशी मागणी आष्टीचे डॉ. अभिजित सायंबर यांनी आष्टीच्या तहसीलदारांना निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत माहिती अशी की, सध्या देशात सर्वत्र कोरोना चे भयानक संकट निर्माण झाले आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून डॉक्टर या रोगातून लोकांना मुक्त करत आहेत मात्र लातूर येथील डॉ.वर्मा यांना मारहाण करण्यात आली आहे.डॉक्टरांवरील हल्ल्याने या कोरोना स्वरंक्षण मोहिमेला मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्रातील विविध भागात अशा प्रकारच्या हिंसाचाराच्या घटना होत आहेत पण राज्यातील प्रशासनाच्या हे लक्षात येत नाही मुंबई दमदाटी करून रुग्णालयांचे बिल कमी करून घेतल्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. प्रत्यक्षात डॉक्टर खूप जास्त बिल लावतात ते रुग्णांना लुबाडतात हे एककल्ली आहे त्या डॉक्टरांची, रुग्णालयांची बाजू समजून घेतली जात नाही.याबाबत शासनाने ठोस पावले उचलावीत खाजगी रुग्णालयांना सरकारने दिले तर न परवडणारे आहेत हे दर वस्तुनिष्ठ नाहीत व्हेंटिलेटर,ऑक्सिजन, पीपी किट, बघता या सगळ्या खर्चात वाढ झाली आहे. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा खर्च वाढला आहे अशा स्थितीत डॉक्टर काम करत आहेत पण सरकार मंत्र्यांकडून वारंवार रुग्णालय डॉक्टरांना लुटतात असे सांगितले जाते. याबाबत याबाबत श्वसन रोग तज्ञ डॉ.अभिजीत सायंबर यांनी सांगितले की ,सोशल मीडियामधून डॉक्टरवर शाब्दिक व व्हिडिओच्या माध्यमातून हल्ले होत आहे. कोरोना उद्रेकात कठीण काळात रुग्णांना वाचण्याचा प्रयत्न डॉक्टर करत आहेत तसेच सरकार आणि विविध पक्षाचे नेते पहिल्या दिवसापासून डॉक्टरांना धमकीवजा भाषेत बोलत आहेत त्यामुळे डॉक्टर बद्दल आकस आणि द्वेष निर्माण झाला आहे. या हल्ल्यामुळे डॉक्टरांचे मनोधर्य खच्ची झाले असून या हल्ल्या मधील प्रमुख आरोपी त्यांना अटक करावी व डॉक्टरांना संरक्षण द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे. कोरोना रुग्णाची थ्रोट स्वब हा डॉक्टरांच्या अखत्यारीतील विषय नसून डॉक्टर आलेल्या रिपोर्ट वरच रुग्णांना सेवा देतात मात्र लोकांमध्ये गैरसमज पसरून डॉक्टरांनीच कोरोना पॉझिटिव्ह दाखविला आहे असा संभ्रम तयार करून डॉक्टरांबद्दल लोकांमध्ये गैरसमज आकस व द्वेष भावना निर्माण केली जात असल्याचे डॉ. सायंबर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here