कोल्हापूर (नियाज जामदार) – जिल्हयामध्ये सध्या मटका जुगार तसेच पत्याचा क्लब यावर कठोर कारवाई करुन त्याची पाळेमुळे खणुन काढल्यामुळे गुन्हेगारांनी जुगाराचे स्वरुप पालटुन तो ऑनलाईन पध्दतीने चालु केले असल्याबाबत व त्यामध्ये मुख्यत्वे तरुण वर्ग व विदयार्थी हे फसत चालले असलेबाबत मा.पोलीस अधिक्षक श्री. अभिनव देशमुख यांच्या लक्षात आल्याने त्यांनी जिल्हा पोलीस दलाला त्याबाबत सतर्क करुन ऑनलाईन जुगारावर लक्ष केद्रित करुन कठोर करवाई करण्याचे आदेश दिले होते.
कोल्हापूर जिल्हयातील तरुण व विदयार्थी यांना मोगाईल,लॅपटॉप,कॉम्प्युटर वर ऑनलाईन जुगाराचे सॉप्टवेअर इस्टाल करुन ऑनलाईन वॉलेट (फोन पे,गुगल पे) व्दारे पैसे स्विकारुन मोठया प्रमाणात जुगार खेळविला जात आहे.त्याकरिता अतिशय गोपनियता ठेवुन जुगार खेळणा-या व्यक्तीस प्रथम त्याचे मोबाईलवर अथवा संगणकावर जुगाराच्या खेळाची लिंक पाठवली जाते. व त्यानंतर त्यास त्याचा वैयक्तिक आय डी पासवर्ड तयार करुन दिला जातो. तसेच सदर खेळामध्ये आवश्यक असलेले क्रेडिट पैशाच्या मोबदल्या मध्ये गेममध्ये ऑनलाईन ट्रान्स्फर केले जाते. ते पैसे ऑनलाईन वॉलेट व्दारे संबधीत डिस्ट्रीब्युटर च्या अकाऊंट मध्ये भरावे लागतात. डिस्ट्रीब्युटर ते पैसे कोल्हापूर जिल्हयाचा मुख्य सुत्रधार याच्या ऑनलाईन वॉलेट मध्ये ट्रान्स्फर करुन तेवढे क्रडिट पॉईंट स्वतःकडे घेवुन ते पुढे जुगार खेळणा-यास उपलब्ध करुन दिले जाते. सदर जुगाराचे रोलेट, रोलेट टायमर, रोलेट मिनी टायमर, फन – रोलेट, आंदर बाहर, तीन पत्ती, कॅसिनो ई प्रकार असुन नशीबाच्या भरवश्यावर कुठल्याही कौशल्याशिवाय संगणकाच्या अथवा सावकारांचे कर्ज डोक्यावर घेवुन नैराश्यने ग्रासलेल्या तक्रारदाराने येवुन तक्रार दिली. त्याच्या तक्रारी प्रमाणे त्यास ऑनलाईन जुगारास प्रवृत्त करुन जुगारामध्ये जिंकण्याचे वारंवार आमिश दाखवुन Super7.club (luckystar) हा ऑनलाईन जुगार खेळून 23 लाख रुपये हारण्यास भाग पाडुन ते पैशाचा अपहार करुन फसवणुक केली अशी कैफियत मांडली सदर फिर्यादीस लॉकडाउन काळात मोबाईलवर देखील जुगाराची
ऑनलाईन लिंक देवुन आय डी पासवर्ड व्दारे जुगार खेळण्यास आरोपीनी प्रवृत्त केले होते. सदर फिर्यादीच्या तक्रारी वरुन दिनांक 28/07/2020 रोजी कोल्हापूर सायबर पोलीस ठाणे गु र नं 13/2020 भा द वि कलम 420,406,34 महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम 1887 कलम 4,5,12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला व आज दिनांक 28/07/2020 रोजी यातील आरोपी नामे ) विजय सिध्दराम वाघमारे, वय.30, , रा. 1382, ई वार्ड, दशरथ मटन शॉप जवळ,राजारामपुरी 12 वी गल्ली, कोल्हापूर.2) संजय परशराम ननवरे, वय.38, रा. दत्ता वाडकर गल्ली, राजारामपुरी 14 थी गल्ली,कोल्हापूर यांना अटक करण्यात आली आहे.त्यांना माननिय कोर्टासमोर रिमांड कामी हजर केले असता कोर्टाने त्यांना 5 दिवसाचा रिमांड मंजुर केला आहे. सदरची कारवाई ही सायबर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक संजय मोरे, सहा पोलीस निरीक्षक मंगेश देसाई पो.ना.सुधीर पाटील,पो.शि.अजय सावंत,अनिल बरगे,सचिन बेंडखळे, सुहास पाटील,विशाल पाटील, अमर वासुदेव, रवि पाटील, मपोशि संगिता खोत, पुनम पाटील व स्थानिक गुन्हे शाखेकडील पो.शि.प्रदिप पवार यांनी केली.
मा.पोलीस अधिक्षक कोल्हापूर यांचेकडुन जनतेस असे आवाहन करण्यात येते की, अशा प्रकारचा ऑनलाईन पध्दतीने मोबाईल फोनच्या माध्यमातुन जनतेस विषेशता तरुण वर्ग व विदयार्थी यांना जुगार खेळण्यास प्रवृत्त करुन जुगार घेणारे एजंट जुगाराचे मुख्य मालक तसेच ऑनलाईन जुगार खेळण्यास प्रवृत्त करण्या-या व्यक्ती व प्रत्यक्षात मोबाईलवर ऑनलाईन जुगार खेळताना कोणी आढळुन आल्यास त्याचेविरुध्द पोलीसांमध्ये तक्रार दाखल करावी. मटक्याप्रमाणेच सदर गुन्हयाची पाळेमुळे खणुन काढुन त्यामध्ये सहभागी सर्व व्यक्तींवर कोणताही मुलाहीजा न बाळगता कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
Home Uncategorized कोल्हापुर जिल्हयातील ऑनलाईन जुगारावर चालवणा-या मुख्य सुत्रधारांना सायबर पोलीस ठाणे कडुन अटक







