वर्धा(समुद्रपूर) (प्रतिनिधी) – दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील रवींद्रनाथ टागोर बहुउद्देशीय शिक्षण संस्था -पुलगाव द्वारा संचालित असणार्या मुक्ताबाई विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय समुद्रपूर चा* निकाल उत्कृष्ट असून येथील इयत्ता 10 वी चा माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी/मार्च 2020चा निकाल ९२.५५ % लागला असून या विद्यालयाने आपली उत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम ठेवली.
या विद्यालयातून प्रथम येण्याचा मान कुमारी- पूजा बेतवार (प्रथम क्रमांक)- 85.80/ कुमार- -चैतन्य बेतवार (द्वितीय क्रमांक)-.83.60/: तर (तृतीय क्रमांक) कमारी – आचल वरघणे ८२.००/: कुमारी–मुस्कान पठाण* ८१.90/: परीक्षेला बसलेले एकूण विद्यार्थी ( ९४) होते. प्राविण्य प्राप्त विद्यार्थी- १४, (प्रथम) श्रेणी असलेली विद्यार्थी- ४२ (द्वितीय) श्रेणीत असलेली विद्यार्थी-२९ व (तृतीय) श्रेणी-२ निकालाची टक्केवारी ९२.५५/: मिळवला. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे रवींद्रनाथ टागोर बहुउद्देशीय शिक्षण संस्था पुलगाव द्वारा संचालित अध्यक्ष सुधाकरराव आंबादाजी घोडे
महाविद्यालयाचे प्राचार्य सौ कल्पना शिंदे , वर्गशिक्षक -श्री. प्रशांत पांढरे , श्री सुहास शिरपूरकर श्री श्रीराम येणूकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. समुद्रपूर तालुक्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांचे नागरिकांमध्ये कौतुक होत आहे. व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेतील कला शिक्षक श्री. मनोज बाचले व समुपदेशक श्री. शरद वांढरे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.








