शिंदखेडा (प्रतिनिधी) : राज्यातील जनतेच्या अडी-अडचणी, समस्या जाणुन घेण्यासाठी शिवसंपर्क अभियानाची सुरुवात दि. 12 जुलै पासून करण्यात आली. शिंदखेडा तालुक्यातील गावांमध्ये या अभियानास दुसऱ्या दिवशीची दांडगा प्रतिसाद मिळाला. त्यानुसार काल (दि.13) रोजी अक्कडसे, वरपाडे, नरडाणा या गावांत बैठका संपन्न झाल्या. शिवसंपर्क अभियानासाठी शिवसेना पदाधिकारी गावात प्रवेश करताच ग्रामस्थांतर्फे बॅन्ड, डफ आदी वाद्ये वाजवुन जोरदार स्वागत करण्यात येत आहे.
राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख मा.उध्दव ठाकरे यांनी जनतेसाठी कोरोना काळात केलेल्या कामाची माहिती तसेच शेतकऱ्यांसाठी, जनतेसाठी घेतलेले लोकापयोगी निर्णय त्यासह महात्मा फुले कर्जमुक्ती योजना, माझे गांव कोरोनामुक्त गांव आदी शासनाच्या कामांची सविस्तर माहिती जिल्हाप्रमुखांनी बैठकांमध्ये दिली.

याप्रसंगी शिवसेना सहसंपर्कप्रमुख अतुल सोनवणे, जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके, उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे, उपजिल्हासंघटक भाईदास पाटील, कल्याण बागल, तालुकाप्रमुख गिरीश देसले, माजी तालुकाप्रमुख विश्वनाथ पाटील, विधानसभा संघटक गणेश परदेशी, शहरप्रमुख संतोष देसले, एसटी कामगार सेनेचे आर.आर.पाटील, स्वीय सहायक रुपेश मराठे आदी उपस्थित होते.
अक्कडसे येथील बैठक
शिवसंपर्क अभियानाची पहिली बैठक अक्कडसे गावांत पीर बाबा दर्गाजवळ संपन्न झाली. यावेळी अक्कडसे गावातील लहान पुलाचे काम करावे असे, गटनेते रावसाहेब सैंदाणे यांनी सांगितले. त्यावर गावातील प्रश्न लवकरच मार्गी लावु, असे आश्वासन जिल्हाप्रमुखांनी दिले. यावेळी गावातील रावसाहेब सैंदाणे, सुदाम सैंदाणे, जगन सैंदाणे, राजेंद्र बागुल, रमेश बागुल, बारकु कुंवर आदी उपस्थित होते.

वरपाडे येथील बैठक
शिवसंपर्क अभियानाची दुसरी बैठक वरपाडे गावातील ग्रामपंचायत कार्यालयात संपन्न झाली. सुरुवातीस वरपाडे गावांत मंजुर झालेल्या आरओ वॉटर, संरक्षक भिंत, गटार आदी विकास कामे मंजुर केल्याबद्दल ग्रामस्थांतर्फे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांचे आभार व्यक्त करुन कामाचे भुमीपुजन करण्यात आले. तसेच शिवसंपर्क अभियानाची सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी वरपाडेच्या सरपंच सायजाबाई अहिरे, उपसरपंच मनोहर पवार, उषाबाई यादव, सुमनबाई चित्ते, नेवाडेचे सरपंच लक्ष्मीकांत साळुंके, भुषण पवार, संदीप पवार, ॲड.वसंत पाटील, नंदु पाटील, बापु गोसावी, नंदु पवार, अरुण पवार, भाईदास देसले, मनोज पवार, रमेश अहिरे, कैलास अहिरे आदी उपस्थित होते.

नरडाणा येथील बैठक
शिवसंपर्क अभियानाची दुसरी बैठक नरडाणा गावातील ग्रामपंचायत कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीला मोठ्या प्रमाणावर तरुणांची उपस्थिती होती. नरडाणा हा शिवसेनेचा गड राहिला असुन येथे मोठ्या प्रमाणात शिवसेनेची ताकद आहे. गावातील तरुण मंडळी ही आता शिवसेना पक्षात येत आहेत याबद्दल जिल्हाप्रमुखांनी समाधान व्यक्त केले. यावेळी स्थानिय लोकाधिकार समितीचे जिल्हाध्यक्ष हिरालाल बोरसे, अशोक पाटील, प्रदिप शिंपी, सुरेश सिसोदे, विशाल सिसोदे, भटु देसले, मंगेश ठाकरे, योगेश सिसोदे, गणेश पाटील, तेजस कोळी, शेखर कोंढे, बाबा खाटीक आदी उपस्थित होते.






