‘डेटा मायनिंग अँड आय सी टी ‘ विषयावर राष्ट्रीय परिषद

पुणे (उपसंपादक वासंती देवळे) : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अल्लाना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस च्या वतीने ‘डेटा मायनिंग अँड आय सी टी ‘ विषयावर राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. ही परिषद १६,१७ जुलै 2021 रोजी ऑनलाईन होणार आहे. अल्लाना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेसचे प्रभारी संचालक डॉ रोशन काझी यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.



बायो इनफॉरमॅटिक्स ,ऍग्रो इनफॉरमॅटिक्स ,बिझनेस मॅनॅजमेन्ट ,मेडिकल इनफॉरमॅटिक्स विषयातील डेटा मायनिंग अँड आय सी टी वर या परिषदेत चर्चा होणार आहे. डॉ संजय कदम (वरिष्ठ संचालक ,सी डॅक ),डॉ अजित मोरे (भारती विद्यापीठ आय एम ई डी ),मुनव्वर शेख (एच एस बी सी ),डॉ सोनल खोसला (इन्फिनिटी ग्लोबल ),डॉ बलजित कौर (भारती विद्यापीठ आय एम ई डी), तसेच टायटस न्यूटन हे मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.

 

ncdm

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here