खुलताबाद (प्रतिनिधी मुनीर खान) : खुलताबाद तालुक्यातील वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या बाजार सावंगी लगत व कलेक्शनच्या पायथ्याशी बाजार सावंगी येथील बीट अंतर्गत येणाऱ्या फॉरेस्टर व चौकीदार यांच्या आशीर्वादाने व विशेष म्हणजे वनविभागाच्या कार्यालया जवळच दिवसाढवळ्या वनविभागातील झाडांची सर्रास कत्तल सूरू आहे
मोठ्या प्रमाणात आसपासच्या गावात बैल गाडी च्या साह्याने सर्रास विक्री करीत आहे याकडे मात्र वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचारी आर्थिक देवाणघेवाण करीत असल्यामुळे याकडे मुद्दामून दुर्लक्ष करीत आहे बाजार सावगीत वनपरिक्षेत्र कार्यालय असूनही कुठलाही वनपरिक्षेत्र कर्मचारी चौकीदार फॉरेस्टसर रेंजर R.FO) यांच्यातील एकही या कार्यालयात हजर राहत नसल्यामुळे वनविभागाची तक्रार कोणाकडे करावी हा फार मोठा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे

सध्याच्या घडीला शेतकऱ्यांच्या शेतात मका कापूस उडीद मूग अशा अनेक प्रकारच्या कडधान्याची लागवड शेतकऱ्यांनी केलेली असून मात्र मोठ्या प्रमाणात हरीण या कडधान्याचे नुकसान करीत फस्त करीत आहे मागील दोन दिवसापूर्वीच बाजार सावंगी लोणी बोडखा व परिसरातील शेतकऱ्यांनी बाजार सावंगी येथील वन विभागाच्या कार्यालयावर मोर्चा थेट मोर्चा नेला होता परंतु वनविभागाच्या कार्यालयाला कुलूप लावली असल्यामुळे व तेथे एकही कर्मचारी हजर नसल्यामुळे शेतकऱ्यांनी कार्यालयासमोर संताप व्यक्त केला या अगोदरही या झोपलेल्या व बहिऱ्या अपंग आंधळ्या वन विभागाच्या कर्मचाऱ्याना कित्येक वेळा निवेदने देऊनही या कुंभकर्ण प्रशासनाला जाग येईना अशी चर्चा सध्या शेतकरी वर्गातून होत आहे







