अवैध वाळू उपसा करणार्‍यांवर पनवेल तहसिलची धडक कारवाई,वाळू माफियांचे धाबे दणाणले

पनवेल (प्रतिनिधी विनया म्हात्रे-मेढेकर) : पनवेलमधील रोडपाली व वाघिवली येथे लाँकडाऊन काळात अवैधरित्या वाळू उपसा होत असून पर्यावरणास धोका निर्माण होवून पर्यावरणाचे नूकसान होत असल्याबाबतच्या वारंवार तक्रारीनुसार पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. त्यामुळे बेकायदेशीर वाळू उत्खनन करणार्‍यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.


सोमवार दि.12 जुलै सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास रोडपाली, वाघिवली हद्दीत ओहोटीच्या वेळी बेकायदेशीररित्या एका बोटीच्या सहाय्याने वाळू उपसा होत असल्याची गोपनीय तक्रार प्राप्त होताच सकाळी अकरा वाजता भरती सुरू झाल्यानंतर पनवेल तहसील कार्यालयाचे पथक त्याठिकाणी बारा वाजण्याच्या सुमारास पाठवण्यात आले.
सदर ठिकाणी पथकाला चार अनधिकृत बोटी दिसून आल्या. मात्र कारवाईसाठी आलेल्या कर्मचार्‍यांना पाहताच बोटीतील वाळू उपसा करणानी तेथून पळ काढला. परंतु त्याजागी अवैध वाळू उपसा करणार्‍या बोटी असल्याने त्या पथकामार्फत नष्ट करण्यात आल्या. सदरची कारवाई पनवेल तहसीलदार विजय तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी मंडळ अधिकार्‍यांच्या दोन पथकांनी केली.

panvel-sand-mafia


पनवेल परिसरात अनेक ठिकाणी संधीचा फायदा घेऊन बेकायदेशीररित्या वाळुमाफिया सक्रिय झाले होते. विशेषतः रात्रीच्या वेळेला राज रोज पणे वाळू उत्खनन केले जात असल्याचे प्रकार तक्रारदारांनी केलेल्या तक्रारीनंतर समोर आले होते.तसेच वांरवार तक्रारदार याने पाठवूरावा केल्याने त्या अनुषंगाने तहसीलदार विजय तळेकर यांनी वाळू माफियांवर कारवाईचा बडगा उगारला असून यापूर्वीही अनेकदा वाळू उत्खनन करणार्‍यांवर कारवाई केली आहे.तरीदेखील काहीजण छुप्या पद्धतीने अवैध वाळू उपसा करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वाळू उपसा करणार्‍या बोटी नष्ट करण्यात आल्याने वाळू माफियांचे या मुळे झोप ऊडाली असुन त्यांना पनवेल प्रशासनानी सळो कि पळो करुन सोडल आहे.

अवैधरित्या वाळू उपसा व वाळूची बेकायदा वाहतूक यासोबतच काही ठिकाणी नदी नाल्यांतील पाणी सक्शन पंपाच्या साहाय्याने विनापरवानगी वापरून वाळू धुत असल्याचे प्रकारही निदर्शनास येत आहेत. काही ठिकाणी धुतलेली वाळू रस्त्यालगतच अतिक्रमण करत साठवण करुन ठेवली जाते. याबाबत नागरिकांनी त्यांच्याकडे विचारणा केली असता दादागिरी व दमदाटी होत असल्याचेही स्थानिक नागरिक व पर्यावरणप्रेमींकडून सांगण्यात आले. त्यामुळे अशांवरदेखील कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे. या आधी वाळू माफियांनी कारवाई केल्या नंतर सरकारी कर्मचारी व पत्रकार यांच्या वर राज्यात हल्ले झाले आहेत . यांच्या मागे वाळू माफियांचा कोन गाँड फ्राँदर आहे याचा शोध लावणे पण तेवढच महत्त्वाचे आहे,असे स्थानिकांचे मत आहे.अश्या कारवार्ई सर्व ठिकाणी होणे गरजेच आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here