कोल्ड चेनच्या विकासात पुण्याचा महत्वाचा वाटा :अरविंद सुरंगे

कोल्ड चेन क्षेत्राला देशात प्रारंभ करणाऱ्या ए. सी. आर. प्रोजेक्ट कनसल्टंटस प्रा. लि.चा सुवर्ण महोत्सव

पुणे (उपसंपादक वासंती देवळे) : जागतिक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होऊन भारतात कोल्डचेनचे नवे पर्व सुरु करणाऱ्या ए. सी. आर. प्रोजेक्ट कनसल्टंटस या भारतातील पहिलीच तांत्रिक सल्लागार कंपनी १६ जुलै रोजी सुवर्ण महोत्सव साजरा करीत आहे . देशात आणि जागतिक पातळीवर विकसित होत असलेल्या ‘कोल्ड चेन’या क्षेत्राच्या प्रगतीत,विकासात पुण्याचा महत्वाचा वाटा राहील असे मनोगत ए. सी. आर प्रोजेक्ट कनसल्टंटस चे संस्थापक अरविंद सुरंगे यांनी यानिमित्ताने व्यक्त केले आहे. प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी या क्षेत्राच्या प्रगतीबाबत माहिती दिली.

ए. सी. आर. प्रोजेक्ट कन्सल्टंटस ने या व्यवसायाची स्थापना सन १९७१ मध्ये केली आणि आज सन २०२१ मध्ये सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करत आहेत.भारताच्या अन्न प्रक्रीया व कोल्ड चेन डेव्हलपमेंट क्षेत्रातील एक अग्रगण्य तांत्रिक सल्लागार असा या कंपनीचा लौकिक आहे.


या पन्नास वर्षाच्या काळात अन्नप्रक्रीया व कोल्डचेन डेव्हलपमेंट क्षेत्रात ए. सी. आर. पी.सी. ने ७०० पेक्षा अधिक प्रोजेक्ट यशस्वीपणे पूर्ण केले आहेत. या मध्ये शासकीय, खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील प्रोजेक्ट आहेत. देशातील बहुतेक सर्व भागात त्याचे तंत्रज्ञान पोहोचलेले आहे. जागतिक पातळीवर २००८ साली पहिल्यांदाच हरित तंत्रज्ञानावर आधारित ग्रीन कोल्डचेन ही संकल्पना मांडुन तिचा प्रसार केला आहे. एसीआर पीसी प्रा. लि. साठी ही एक महत्वाची बाब आहे. कंपनीचे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल सुरंगे यांचे प्रयत्न या प्रगतीत महत्वपूर्ण ठरले


संपुर्ण फुड प्रोसेसिंग प्रणाली व कोल्ड चेन प्रणाली. फळे, भाजीपाला, मांस, मासे, अंडी व दुग्धजन्य उत्पादनांसाठी बहुउद्देशीय शीतगृह, वातावरण नियंत्रित शीतगृहे,संपूर्ण पॅकहाऊस प्रणाली, कापणी, तोडणी पश्चात संपूर्ण तंत्रज्ञान युक्त प्रणाली,प्रोसेसिंग, पोकलिंग व शीतगह प्रणाली सह,फळ पिकवण्यासाठीचा प्रणाली. फळे, भाजीपाला, मांस, मासे, अंडी व दुग्धजन्य उत्पादन यांसाठी लागणारी फ्रिजिंग,व २०° से. तापमानाची शीतगृह प्रणाली,आइस प्लांट व इंडस्ट्रीयल रेफ्रिजरेशन प्रणाली, फुड डीस्ट्रीब्युशन सेंटर फुड क्लस्टर प्रोजेक्ट, प्रकल्पासाठी लागणारे टेक्नो इकॉनॉमिक रिपोर्ट करणे यासाठी ही कंपनी काम करते

संस्थापक अरविंद सुरंगे यांनी रेफ्रिजरेशन व एअर कडीशनिंग या विषयात रुरकी विश्वविदयालयातून मास्टर्स डिग्री केल्यानंतर ८ वर्षे या क्षेत्रात डिझायनिंग व प्लॅन्ट उभारणी विषयी अनुभव घेतला. त्याच काळात त्यांना जर्मन सरकारच्या प्रशिक्षण योजनेत त्यानंतर डेन्मार्क येथील जगप्रसिध्द साबा कंपनी प्रशिक्षण घेण्याची संधी मिळाली. याच काळात त्यांना ‘कोल्डचेन ह्या क्षेत्रातील प्रकल्पाची माहिती व प्रत्यक्ष अनुभव घेता आला.

भारतात परत आल्यानंतर त्यांच्या लक्षात आले कि येथे नाशवंत मालाच्या उत्पादनास मोठा वाव असुन ती टिकण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कोल्डचेन विकसित होणे अत्यंत गरजेचे आहे. त्या दृष्टिने त्यांनी काही उदयोजकाना बहुउद्देशीय कोल्ड स्टोरेज उभारण्याचे महत्व व आवश्यकता पटवून दिली १९७१ साली भारतातले पहिले मल्टीपर्पज कोल्ड स्टोरेज ‘सनराइज कोल्ड स्टोरेज ‘या नावाने पुण्याजवळ उभारले गेले. ही कल्पना आर्थिकदृष्ट्या यशस्वी झाली व देशात मल्टीपर्पज कोल्ड स्टोरेजची एक मालिकाच सुरु झाली.

तोपर्यंत कोल्डचेन हा शब्द ही भारतात प्रचलित नव्हता. तसेच भारताच्या उत्तर मध्य व पूर्व भागात मुख्यतः काही फारच जुन्या तंत्रज्ञानावर आधारित कोल्ड स्टोरेजस उपलब्ध होती. व त्यांचा वापर फक्त बटाटयाच्या साठवणीसाठी होत असे. आजही काही भागात अशी जुनी स्टोरेजेस अस्तित्वात आहेत.

१९७०-८० या दशकापासून भारतात मल्टीपर्पज कोल्ड स्टोरेज व कोल्डचेनवर आधारित काही प्रकल्प सुरु झाले. त्यात महाराष्ट्र सरकाराचा उपक्रम मॅफको चा महत्त्वाचा होता.नंतरच्या दशकामध्ये जागतिक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होऊन भारतात कोल्डचेनचे नवे पर्व सुरु झाले. ए. सी. आर. प्रोजेक्ट कन्सल्टंटस ही भारतातील प्रथम तांत्रिक सल्लागार कंपनी असल्याने त्यांनी अनेक आधुनिक व नवीन तंत्रज्ञानाच्या वापर अमलात आणला. त्यात प्रामुख्याने इंटीग्रेटेड प्रोजेक्ट डिझाइन, इन्सुलेटेड पॅनल सिस्टिमस, ऊर्जा बचत करणारी आधुनिक रेफ्रिजरेशन यंत्रणा, ऑटोमॅटिक कंट्रोल सिस्टिमस, सुरक्षा यंत्रणा अमलात आणल्या.कोल्ड चेन हा आपल्या आधुनिक जीवनाचा अविभाज्य भाग बनलेला आहे. त्यात नाशवंत खाद्दय उत्पादनेच नव्हे तर औषधे व रक्त साठवण आणि व्हॅक्सीनचा ही समावेश आहे.त्या साठी लागणाऱ्या विविध यंत्र सामग्रीमध्ये रफिजरेशन एक हृदयाप्रमाणे काय करते. २० डीग्री से. ते उणे ७० डीग्री पर्यंत या यंत्रणा काम करतात. रेफिजरेशन ला ‘टेक्नॉलॉजी फॉर सरव्हायवल’ अशी संज्ञा आहे .

या अवधीत भारत सरकारनेही कोल्ड चेन क्षेत्राच्या विकासासाठी काही तांत्रिक व अधिक मदतीच्या योजना आखल्या. एसीआर पीसी प्रा लि ची या क्षेत्रातील कामगिरी बघुन NHB, NCCD वगैरे च्या कमिटयावर नियुक्त केले. यामुळे भारताच्या कोल्ड चेन विकास प्रकियेत ए. सी. आर चा प्रवास सुरु झाला व आजही सुरु आहे ए. सी. आर चे अध्यक्ष अरविंद सुरंगे ह्यांची NCCD च्या NON CONVENTIONAL & SUSTAINABLE APPLICATIONS IN COLD CHAIN” या कमिटीवर सहअध्यक्ष म्हणून नेमणूक झाली. या कमिटीवर भारतातील अनेक तज्ञ सभासद आहेत.

सर्वच प्रकारच्या नाशवंत मालाच्या उत्पादनास पोषक वातावरण, भारत सरकारकडून मिळणाऱ्या प्रोत्साहनपर तंत्रज्ञान पुरवणी व आर्थिक अर्थसहाय्य योजना, मल्टीनेशनल कंपन्याने भारतात सुरु केलेले प्रकल्प इत्यादी सकारात्मक बाबीमुळे कोल्डचेन प्रणाली हा भारतात एक उगवते क्षेत्र (सनराईज सेक्टर) म्हणून ओळखले जाते.

कोल्डचेनच्या आगमनापासूनच कायरत असलेल्या एसीआर पीसी प्रा.लि. ची क्षमता ओळखुन त्याना महाराष्ट्र पणन मंडळ, नॅशनल हॉटीकल्चर बोर्ड, कर्नाटक चोकंपक संस्था, ग्लोबल कोल्ड चेन अलायन्स अशा अनेक संस्थावर टेक्निकल कंन्सलटट म्हणून मान्यता देण्यात आली. एन. एच. बी .ने जागतिक पातळीवर प्रथमच प्रसिध्द केलेल्या कोल्डचेनच्या गाईड बुक्स तयार करण्यात एसीआर पीसी प्रा ली चा महत्वाचा वाटा होता.

भारतात कोल्डचेन विकासाची क्षमता व गरज ओळखून केंद्र सरकारने “नॅशनल सेंटर फार कोल्ड चेन डेव्हलपमेंट” ही एक प्रमुख संस्था उभारली. एसीआरपीसीचे प्रमुख अरविंद सुरंगे यांची “नॉन कंव्हेशनल व सस्टनेबल अॅप्लिकेशन अँड कोल्ड चेन” या कमिटीवर सहअध्यक्ष म्हणून नेमणक झाली. एसीआरपीसी प्रा लि साठी ही एक महत्वाची बाब आहे. कंपनांचे संचालक हर्षल सुरंगे व तंत्रज्ञान विकास अधिकारी आदिती यांना युरोपात आधुनिक तंत्रज्ञानाच्या अभ्यासासाठी NCCD तर्फे नेण्यात आले.

भारतात १९८१ साली इशर (इंडियन सोसायटी फॉर हिटीग रेफ्रिजरेटिंग अॅन्ड एयर कंडिशनिंग इंजिनीअर्स)या संस्थेची स्थापना झाली. एसीआर पीसी प्रा लि चा व इशर चा फार जवळचा संबंध आहे. अरविंद सुरंगे हे इशर पुणे चॅप्टर चे संस्थापक अध्यक्ष आहेत . १९९६-९७ साठी ते इशरेचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले व त्यांना इशरेच्या रेफिजरेशन हॅण्ड बुक च्या निमितीत कमिटी चेअरमन म्हणुन मोलाचे काम केले व त्यांना इशरेतर्फे जीवन सेवा पुरस्कार ही मिळाला.रोटरी क्लब पूना नॉर्थ आणि अरविंद सुरंगे यांच्या माध्यमातून अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी अर्थसहाय्य्य योजना देखील राबविली जाते.

इशरेकडुन कोल्ड स्टोरेजविषयी नवीन तंत्रज्ञानाची पुरवणी म्हणून’ कोल्ड स्टोरेज बेसिक्स’ हे एक अरविंद सुरंगे यांनीच लिहिलेले पुस्तक १९९९ साली प्रसिध्द झाले. त्याची लोकांच्या मागणीवरुन हिंदी, मराठी, तमिळ व कन्नडमध्ये भाषांतर ही प्रसिध्द झाले.

गेल्या ५० वर्षाच्या कारकिर्दीत एसीआरपीसी संचालकांना अनेक वैयक्तिक पुरस्कार मिळाले या क्षेत्रातील जागतिक स्तरावरचा “एशरे फेलो” हा अमेरिकन संस्थेचा पुरस्कार अरविंद सुरंगे यांना शिकागो येथे देण्यात आला. इंडियन सोसायटी इशरे कडुन त्यांचा सर्वोच्च पुरस्कार लाईफ टाइम सर्व्हिस अवॉर्ड देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here