यावल (सुरेश पाटील) – नवयुवक विद्याप्रसारक मंडळ डांभुर्णी संचालित डाँ. दिवाकर खंडू चौधरी विद्यालय डांभुर्णी या शाळेचा निकाल 94.80% लागला असून शाळेतून कु. मोनाली रविंद्र निळे ही 88.00%मिळवून प्रथम आली. कु. रूपाली वासुदेव सपकाळे ही 86.80%मिळवून द्वितीय आली. कु. खगेश राजाराम खर्चे हा 86.. 00% मिळवून तृतीय आला.
सर्व यशस्वी विध्यार्थ्याचे संस्थेचे अध्यक्ष डाँ. श्री. विवेक दिवाकर चौधरी. उपाध्यक्ष श्री. सोनू(शेठ ) गोमा भंगाळे. सेक्रेटरी श्री. दादासाहेब मधुकर नथ्थू सरोदे. व सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक श्री. उमाकांत जनार्दन महाजन, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व डांभुर्णी ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.







