जळगाव (प्रतिनिधी) – आज (दि.३१) तपासणीकरिता कोरोना संशयितांचे पाठविलेल्या स्वॅबचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर जिल्ह्यात कोरोनाने अकरा हजारांचा टप्पा ओलांडला आहे. आज नव्याने २४५ कोरोनाबाधित रूग्णांची भर पडली आहे. एकूण रुग्णसंख्या ११ हजार १०३ झाली आहे. सर्वाधिक ५७ कोरोबाधाीत रुग्ण हे जळगाव शहरात आढळून आले आहेत. दिवसभरात १२ कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर २७० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
शुक्रवारी नव्याने आढळलेल्या रूग्णांमध्ये जळगाव शहर ५७, जळगाव ग्रामीण १७, भुसावळ १३, अमळनेर २८, चोपडा २६, पाचोरा ४, भडगाव १२, धरणगाव ३, यावल २, एरंडोल १, जामनेर ३०, रावेर २, पारोळा ५, चाळीसगाव २९, मुक्ताईनगर १०, बोदवड ५ इतर जिल्ह्यातील एक अशी रूग्ण संख्या आहे. दिवसभरात १२ कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात जळगाव शहर ३, रावेर, चाळीसगाव तालुक्यात प्रत्येकी २, अमळनेर, यावल, पाचोरा, भुसावळ, पारोळा तालुक्यात प्रत्येकी एका रूग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.







