छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या हिदंवी स्वराज्याची राजधानी रायगड येथील पवित्र माती अयोध्या येथे होणाऱ्या प्रभु रामचंद्र मंदिराच्या पायाभरणीसाठी रवाना

मुंबई (प्राजक्ता अरूण चव्हाण) – समस्त हिंदुचे श्रद्धास्थान असलेल्या अयोध्या येथील प्रभु रामचंद्र यांच्या नवीन बांधण्यात येणाऱ्या राममंदिराच्या ५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या पायाभरणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या स्वराज्याची राजधानी रायगड येथील माती बजरंग दलाच्यावतीने पाठवण्यात येणार आहे. रायगड वरिल ही पवित्र माती आणण्याची जबाबदारी बजरंग दलाच्यावतीने शिलेदार अॅडव्हेचर या संस्थेला देण्यात आली होती. मुंबई येथील बजरंग दलाचे मावळे मितेश खामकर, अविनाश मेमाणे, राहुल करगुटकर आणि शिलेदार संस्थेचे अध्यक्ष सागर नलवडे तसेच सहकारी सुशांत पेडणेकर, प्रथमेश कानडे यांच्या टीमने नुकतेच रायगड येथे जाऊन रायगडवरिल पवित्र माती मुंबई येथे आणण्यात आली आहे. मुंबई येथे विधीवत पुजा करुन ही माती अयोध्येला पाठवण्यात येणार आहे.
आम्हाला ही संधी मिळणे म्हणजे, आमचे अहोभाग्य असुन आजवर सह्याद्री मध्ये निस्वार्थी भावनेने केलेल्या कार्याचे हे फलीतच म्हणावे लागेल. असे शिलेदार संस्थेचे अध्यक्ष सागर नलवडे यांनी आपले मत व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here