जळगाव (क्राइम रिपोर्टर असलम खान) : येथील रामेश्वर कॉलनीतील विश्वकर्मा नगरात राजस्थानी कारागीराचे घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी बंद घरातून रोख रकमेसह दागिन्यांची चोरी केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रामप्रताप किशनराम सैनी हे बांधकाम साईटवर टाईल्स बसविण्याचे काम करतात. १ जुलै ते १७ जुलै दरम्यान त्यांचे घर बंद असल्याची संधी साधत चोरट्याने घराच्या दरवाज्याचा कडीकोयंडा तोडून रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा ७० हजार रुपयांचा ऐवज चोरी केला आहे.
या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरु आहे.






