शिवसेना लांडगे गल्ली शाखा तर्फे नवनिर्वाचित पदाधिकारी याचा सत्कार

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) : धरणगाव येथील समाज कार्यात नेहमी अग्रेसर असणारे शिवसेना उपजिल्हा प्रमुख पी एम पाटील सर याची मराठा फौंडेशनच्या जिल्हा अध्यक्ष पदी निवड झाली तसेच आरोग्य क्षेत्रात नेहमी अग्रेसर असणारे जैन समाजाचे मनीष भाऊ लाड,यांची मेडिकल असोसिएशन चा तालुका अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल, तसेच परीट समाजाचे जिल्हा संघटक छोटू भाऊ जाधव यांची मेडिकल असोसिएशन चा तालुका सचिव पदि निवड झाल्याबद्दल सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी याचा सत्कार करण्यात आला.

शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ , लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी,माजी उपनगराध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या हस्ते सत्कारार्थींचा सत्कार करण्यात आला

यावेळी उपस्थित शिवसेना उपशहर प्रमुख रवी जाधव युवा सेना उपतालुका प्रमुख कमलेश बोरसे, नगरसेवक नंदू पाटील, अशोक देशमुख,कैलास धनगर,योगेश पी पाटील,मोहन पाटील,दिनेश देशमुख,शाम पाटील,अरविद चौधरी आदी उपस्थित होते सूत्रसंचालन विनोद रोकडे यांनी केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here