नंदुरबार (जिल्हा प्रतिनिधी विजय पाटील) : जिल्ह्यातील तोरणमाळहून खडकी पॉईंट येथून सिंधी येथे जाताना क्रूझर टॅक्सी दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे.
या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. उर्वरित जखमींवर तोरणमाळ रुग्णालयात उपचार सुरु आहेत. क्रूझर दरीत कोसळण्यापूर्वी प्रवाशांनी गाडीबाहेर उड्या मारल्याने त्यांचा जीव वाचला. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
धडगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या तोरणमाळ येथील खडकी रस्त्यावर सिंधी गावाकडे जाणारी क्रूझर गाडी दरीत कोसळली. एका वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले. या अपघातात ८ जण ठार झाले आहेत. हा अपघात रविवारी दुपारी अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात आले.






