मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : गेल्या २४ तासांपासून कोकणासह मुंबईत मुसळधार पाऊस बरसत आहे. या पावसामुळे मुंबईत दोन ठिकाणी दुर्घटना घडल्या असून त्यात २४ जणांचा मृत्यू झाला आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार अजून २४ तास मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
या काळात वाऱ्याचा वेगही वाढण्याचा इशारा देताना मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधदुर्ग जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत पुढील तीन ते चार तासांत मुसळधार ते अती मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
यामुळे मुंबईतील सखल भागात पाणी साचणे, वेगवान वारे, रेल्वे-विमानांना अडथळे, पाणी-वीज पुरवठ्यात अडचणी येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.






