टोकियो ऑलिंम्पिकवर कोरोना सावट गडद; अजून दोन खेळाडू आढळले कोरोना पॉझिटिव्ह

टोकियो : पाच दिवसानंतर टोकियो येथे ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात होणार आहे. मात्र, स्पर्धांपूर्वी खेळगावात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. दोन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून एकूण कोरोनाग्रस्त खेळाडूंची संख्या तीनवर पोहोचली आहे. या खेळाडूंना १४ दिवसांच्या क्वारंटाइन कालावधीत पाठवण्यात आले आहे.

टोकियो ऑलिम्पिक आयोजन समितीने रविवारी ही माहिती दिली. यामुळे २३ जुलैपासून सुरू होणाऱ्या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनांबद्दल भीती निर्माण झाली आहे. खेळगावात राहणाऱ्या खेळाडूंनाच प्रथम संसर्ग झाला. आयोजकांनी खेळाडूंची ओळख जाहीर केलेली नाही.

आयोजन समितीने जाहीर केलेल्या कोरोनाग्रस्तांच्या यादीनुसार दिवसभरात एकूण १० प्रकरणे नोंदली गेली आहेत. यात पाच क्रीडासंबंधित व्यक्ती, एक कंत्राटदार आणि एक पत्रकार आहे. समितीच्या नोंदीनुसार, खेळाशी संबंधित कोरोना प्रकरणांची संख्या आता ५५ वर पोहोचली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here