लायन्स क्लब जळगाव सेन्ट्रल तर्फे पोस्टमन बंधूना मास्क वाटप

जळगाव (निलेश पाटील) – बुधवारी (दि.२९ जुलै) लायन्स क्लब जळगाव सेन्ट्रल या संस्थेतर्फे जळगावातील मुख्य पोस्ट कार्यलयात जळगावातील सर्व पोस्ट कार्यालयातील पोस्टमन बंधूना फेस प्रोटेक्टर शिल्ड व हातरुमाल चे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमा प्रसंगी लायन्स क्लब जळगाव सेन्ट्रल चे अध्यक्ष सी.ए जयेश ललवाणी, सचिव लायन.अविनाश कक्कड, कोषाध्यक्ष लायन दिनेश राका, लायन.पराग लुंकड, डाक अधीक्षक जळगाव विभाग पी.बी. शेलुकर, पोस्ट मास्टर एस.एम.कुलकर्णी, व सहाय्यक डाक अधीक्षक अनुप गणोरे हे उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान डाक अधीक्षक यांनी उपस्थित सर्व पोस्टमन बंधूना प्रोत्साहित केले आणि लायन्स क्लब सेन्ट्रल या संस्थेचे आभार मानले नंतर सर्व पोस्टमन बंधूंचे सचिव अविनाश कक्कड यांनी आभार मानले तसेच या कार्यक्रमाला ज्यांनी प्रायोजकत्व दिले ते लायन. नितीनजी रायसोनी यांचे हि लायन्स क्लब जळगाव सेन्ट्रलच्यावतीने आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here