आता २८ ऑगस्ट रोजी परीक्षा होणार
मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे मार्फत घेण्यात येणारी “राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून (उत्तराखंड) प्रवेश पात्रता परीक्षा दि.५ जून २०२१ रोजी होणार होती परंतू एप्रिल व मे २०२१ या महिन्यातील देशातील व राज्यातील कोविड-१९ चा प्रादुर्भाव तसेच परिस्थितीचा विचार करुन कमांडंट आर.आय. एम.सी.देहराडून, यांनी ५ जून २०२१ रोजी होणारी परीक्षा पुढे ढकललेली होती
सध्याची देशातील व राज्यातील कोविड-१९ चा प्रादूर्भाव तसेच परिस्थितीचा विचार करुन कमांडंट आर.आय.एम.सी. देहराडून, यांनी “राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून (उत्तराखंड) प्रवेशपात्रता परीक्षा” जून २०२१ ही दि. २८ ऑगस्ट २०२१ रोजी घेणेबाबत कळविले आहे.
परीक्षेचे वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे – परीक्षेचे वेळापत्रक याप्रमाणे असणार आहे :- दि. २८ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ९.३० ते ११.०० वा. गणित, दुपारी १२.०० ते १.०० वा. सामान्य ज्ञान व दुपारी २.३० ते ४.३० वा. इंग्रजी विषयाचा पेपर होणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्तांनी दिली आहे.






