इराकमध्ये आत्मघातकी हल्ला, ३५ जणांचा मृत्यूच तर ६० पेक्षा जास्त जखमी

इराक : येथील सदर शहरात दहशतवाद्यानं केलेल्या आत्मघाती हल्ल्यात ३५ नागरिकांचा मृत्यू झालाय तर ६० पेक्षा जास्त जखमी झाले आहेत. या हल्ल्याची जबाबदारी दहशतवादी संघटना आयएसनं घेतली आहे. याच वर्षी एप्रिलमध्ये आयएसने इराकच्या सदर शहातील एका बाजारात हल्ला केला होता. त्यात ४ जणांचा मृत्यू झाला होता तर २० जखमी झाले होते. त्यापूर्वी, जानेवारीमध्ये सेंट्रल बगदाद तायारन स्क्वायर मार्केटमध्ये झालेल्या सुसाइड बॉम्ब अटॅकची जबाबदारीही आयएसने घेतली होती. त्या हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू झाला होता.

हल्ला सोमवारी सायंकाळी झाला. इराकमध्ये मंगळवारी ईद असल्यामुळे बाजारात मोठी गर्दी होती, याचाच फायदा दहशतवाद्यांनी घेतला. या हल्ल्यानंतर इराकचे पंतप्रधान मुस्तफा अल-काधेमींनी सुरक्षा कमांडर्सची आपतकालीन बैठक बोलावली आहे.

राष्ट्रपती बरहाम सालेह यांनी सोशल मीडियाद्वारे दुःख व्यक्त केलं. ते म्हणाले की, घडलेली घटना अत्यंत वाईट आहे. काही जणांनी ईदमुळे झालेल्या गर्दीचा फायदा घेऊन आत्मघाती हल्ला केला. आता जोपर्यंत दहशतवाद मुळापासून संपत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाहीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here