सावधान ! कोल्हापूरात अतिवृष्टीची शक्यता

कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार) : भारतीय हवामान वेधशाळेने २० जुलै रोजी ऑरेंज अलर्ट, २१ व २२ जुलै रोजी ‘रेड अलर्ट’ व २३ जुलै रोजी ‘ऑरेंज अलर्ट’ दिलेला आहे. वेधशाळेच्या अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्याला उद्या बुधवार पासून ‘नागरिकांना तीन दिवस सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

अंदाजित पाऊसमानानुसार नदी पात्रातील पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच डोंगराळ भागामध्ये भूस्खलन अथवा दरडी कोसळणे अथवा गावठाणातील जुन्या घरांची पडझड होणे, या सारख्या घटना संभावत असल्याने नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाने मंगळवारी केले आहे.

या कालावधीमध्ये अति पाऊसमान ( प्रतिदिन ७० ते १५० मि.मी. किंवा त्याहून जास्त) होण्याची शक्यता आहे. विशेषत: जिल्हयातील चंदगड, आजरा, राधानगरी, शाहूवाडी, पन्हाळा, गगनबावडा, भुदरगड या तालुक्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here