जळगावमध्ये अवतरला साक्षात पांडुरंग; छोट्या खुशावर्थ च्या रुपात भाविकांनी घेतले विठ्ठलाचे दर्शन

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी चित्रा चौधरी) : सध्या कोरोना प्रादूर्भावामुळे राज्यातील शाळा जरी बंद असल्या तरी ऑनलाईन पध्दतीनी शाळा भरत आहेत. विद्यार्थ्याना आपल्या संस्कृतीची ओळख व्हावी, त्यांचा शैक्षणिक तसेच सांकृतिक व सामाजिक विकास व्हावा यासाठी शिक्षक अतोनात प्रयत्न करीत आहेत. असेच उपक्रम एल एच पाटिल इंग्लीश मिडीयम स्कूल, जळगाव ही शाळा आयोजित करीत असते.

याच उपक्रमांचा भाग म्हणून दिनांक २० जुलै २०२१ रोजी एल एच पाटिल इंग्लीश मिडीयम स्कूल, जळगाव या शाळेने आषाढी एकादशीचे औचित्य साधून शाळेतील विद्यार्थ्यांसाठी वेशभूषा, अभंग, पसायदान, भजन, भावगीत व नृत्य स्पर्धांचे आयोजन केले होते. याच इयत्ता दुसरीच्या विद्यार्थी खुशावर्थ (साई) राणे याने विठूरायाची वेशभूषा साकारली. ही वेशभूषा साकारण्यासाठी चित्रकला शिक्षक नंदकिशोर घनश्याम पाटिल खुशावर्थ (साई) याला मार्गदर्शन व सहकार्य केले.

pandurang-at-jalgaon

सदर ऑनलाईन स्पर्धेत शाळेचे संस्थापक एल. एच. पाटील, जितेंद्र पाटील, कुणाल राजपूत देखील उपस्थित होते. सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे प्राचार्य शिल्पा मलारा यांनी मार्गदर्शन केले तसेच मोनली राणे यांनी सूत्रसंचालन केले व सहभागी झालेल्या सर्वांचे आभार मानले.

pandurang-at-jalgaon

jalgaon1शाळेची ऑनलाईन स्पर्धा संपल्या नंतर खुशावर्थ (साई) राणे याचे वडील अॅड. रजनीश राणे हे त्याला घेवून जवळच्या स्वामिनारायण मंदिरात दर्शनसाठी गेले असता साई राणे याला विठ्ठल रुपात पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली. तर काही भाविक साई राणे याला विठ्ठल समजून त्याच्या चरणी नतमस्तक झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here