जळगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) : धुळे जिल्ह्यातील कुसुंबा येथील आश्रम शाळेत नाशिक विभाग ग्रंथालय संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा मावळते अध्यक्ष ऍड. संभाजी पगारे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 18 जुलै रोजी सकाळी 11 वाजता घेण्यात आली .यावेळी अनेक विषयावर चर्चा करून कार्यकारिणीची मुदत संपल्याने डॉ . दत्ता परदेशी यांची अध्यक्षपदी तर जळगाव जिल्ह्यातील पारोळ्याचे श्री सतीश पाटील सर यांची नाशिक विभागावर कोषाध्यक्षपदी बिनविरोध निवड घोषित करण्यात आली .
यावेळी कार्यवाहक धुमाळ ( चाळीसगाव ) यांनी अहवाल वाचन करून सर्व विषय मंजूर करण्यात आले . कार्यकारी मंडळाची मुदत तीन वर्षांनी संपल्याने पुढील तीन वर्षांसाठी नवीन कार्यकारिणी निवड करण्यात आली .अध्यक्षपदी डॉक्टर दत्ता परदेशी (धुळे) कोषाध्यक्षपदी श्री सतीश पाटील सर (जळगाव ) कार्यवाहपदी प्रवीण पाटील ( नंदुरबार ) अजय शहा (कार्याध्यक्ष नाशिक) यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली .
यावेळी पाचही जिल्ह्यातील ग्रंथालय पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. नवनिर्वाचित कार्यकारी मंडळाचे शाल श्रीफळ पुष्पहार घालून मावळते अध्यक्ष अॅड. संभाजी पगारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . यावेळी श्री अनिल सोनवणे (जिल्हाअध्यक्ष धुळे )राहुल महिरे (कार्यवाहक धुळे) श्री .पी .एम .पाटील सर (जळगाव जिल्हा उपाध्यक्ष ),श्री संजय पाटील (जिल्हा कार्यवाह जळगाव ),श्री धुमाळ सर ,श्री किशोर पाटील ( शेतकरी संघटना तालुका प्रमुख पारोळा) ,श्री. शशिकांत पाटील (अमळनेर) ,श्री रवी दादा (धरणगाव ),श्रीमती. संगीता पाटील ,मनोज पाटील (पारोळा), मोरे (चोपडा), श्री. यशोद (चाळीसगाव ),श्री. अविनाश भदाणे (धुळे ) आ.ओ.पाटील (धुळे ) रोहिदास हाके, हि .रा . चौधरी श्री भरत रोकडे सर्व धुळे, श्री शहा (नाशिक) आदींची उपस्थिती होती






