जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी पी एम पाटील यांची निवड झाल्याबद्दल पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी केला सत्कार

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) : महाराष्ट्र प्रदेश सकल मराठा समाजाचे प्रदेश अध्यक्ष अँड बापूसाहेब जाधव यांच्या आदेशान्वये प्रदेश सचिव रवींद्र धुमाळ कोल्हापूर यांनी धरणगाव मराठा समाजाचे नगराध्यक्षपदाचे प्रथम मानकरी पी एम पाटील सर यांची जळगाव जिल्हा सकल मराठा समाज अध्यक्ष पदी निवड केली.

त्यांच्या या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा मंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी सत्कार केला. या प्रसंगी सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ,नगराध्यक्ष नीलेश चौधरी,शहर प्रमुख राजेंद्र महाजन,ता.उपप्रमुख राजेंद्र ठाकरे,वासुदेव चौधरी,विजय महाजन,संजय चौधरी,भानुदास आप्पा विसावे,रवींद्र जाधव,विलास महाजन,नंदू पाटील,बुट्या पाटील,जीतु धनगर,योगेश पी.पाटील,वाल्मीक पाटील पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here