धरणगाव तालुका युवती सेना तालुका प्रमुखपदी नेहा प्रकाश पाटील.

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशान्वये युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुका युवतीसेना प्रमुख पदी नेहा प्रकाश पाटील हिची निवड केली आहे.

नेहा पाटील ह्या जळगाव जिल्हा सकल मराठा समाजाचे अध्यक्ष शिवसेना उपजिल्हा प्रमुख तथा धरणगाव माजी नगराध्यक्ष पी एम पाटील सर यांची मुलगी असून हॉलीबॉल विद्यापीठ खेळाडू आहे.

तिच्या निवडीबद्दल जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना गुलाबराव पाटील,संपर्कप्रमुख संजयजी सावंत,सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ,जिल्हा प्रमुख विष्णू भाऊ भंगाळे,महिला जिल्हा प्रमुख महानंदा पाटील, युवा जिल्हाधिकारी शिवराज पाटील, धरणगाव माजी नगराध्यक्षा सौ उषाताई वाघ, माजीप्रभारी नगराध्यक्षा सौ सुरेखा महाजन, धरणगाव नगराध्यक्ष निलेश चौधरी, शहर प्रमुख राजेंद्र महाजन, उपनगराध्यक्षा सौ कल्पना महाजन यांनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here