ठाणे (सहसंपादक सतीश बनसोडे) : कल्याणमधील वालधुनी नदीत शुक्रवारी दुपारी एक तरुण वाहत जात असल्याचे पुलावरील पादचाऱ्यांना दिसले. पोलिसांनी दोराच्या साहाय्याने या तरुणाला वाचविले. मद्याच्या नशेत असलेला हा २४ वर्षाचा तरुण गणेश घाट भागातून नदीत उतरला होता.
पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने तो वाहून जाऊ लागला. तो वाहून शहाड येथील पुलाच्या खांबाला अडकला. तेथे त्याने खांबाचा आधार घेतला. त्याला नदीत दोर टाकून बाहेर काढण्यात आले. त्याला तात्काळ उपचार करण्यासाठी रुग्णालयात पाठवून देण्यात आले. पोलीस घटनास्थळी आले नसते तर हा तरुण वेगवान पाण्या बरोबर वाहून गेला असता.






