अलिबाग (प्रतिनिधी राजेश बाष्टे) : मागील काही दिवस कोकणात प्रचंड प्रमाणात मुसळधार पाऊस पडत असून रत्नागिरी जिल्ह्यातील बऱ्याच ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली असून या बाबत आज रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री मा. ना अनिलजी परब व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा. ना उदयजी सामंत ह्यांच्या उपस्थित जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी येथे घेण्यात आला.
त्याप्रसंगी राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉ.राजनजी साळवी ह्यांनी राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघा तील राजापूर तालुक्यात प्रचंड प्रमाणात अतिवृष्टी मुळे नुकसान झाले असल्याबद्दल लक्षत आणून देत धाऊलवल्ली येथील रस्ता व काही घरांना लागणारी संरक्षण भिंत व नाटे ठाकरेवाडी येथे झालेल्या सकवाचे नुकसान त्यासाठी लागणारा १ कोटी निधी ची मागणी करताच महाराष्ट्र शासनाचा क गटातील १९ कमकुवत पुलाची दुरुस्ती हेड मध्ये निधी मंजूर करण्यात येईल अशी ग्वाही रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री मा. ना अनिलजी परब ह्यांनी दिली.

राजापूर तालुक्यातील अर्जुना नदी ला दरवर्षी पूर येतो त्या उपाययोजने साठी नदी पत्रातील गाळ काढण्याची उपाय योजना जाईल अशीही ग्याही मंत्री महोदयांनी दिली. व राजापूर तालुका अतिवृष्टी मुळे जे जे नुकसान झाले त्याचे सर्व भरपाई दिली जाइल असे वचन देऊन आज राजापूर तालुक्यातील पूरपरिस्थिती च्या पहाणीचा नियोजित दौरा होता तो रद्द करून चिपळूण तालुका इथे मोठ्या प्रमाणात आलेल्या पुरामुळे बरेच लोक अडकली असल्याने चिपळूण दौरा साठी पालकमंत्री रवाना झाले त्याप्रसंगी विभागीय आयुक्त विलास पाटील, जिल्हाधिकारी डॉ.बी एन पाटील, निवासी जिल्हाधिकारी दत्ता भडकवार, अप्पर जिल्हाधिकारी डॉ.संजय शिंदे, जिल्हा पोलिस अधीक्षक मोहितकुमार गर्ग, जि. प. मुख्याधिकारी इंदुमती जाखड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, जि. प. उपाध्यक्ष उदय बने, रत्नागिरी नगरपरिषद नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी उपस्थित होते.






