विश्ववेध राज्य पत्रकार संघटनेच्या इलेक्ट्रॉनिक मिडीयाच्या जळगाव जिल्हाध्यक्ष पदी चित्रनिश मधुकरराव पाटील यांची निवड

जळगाव (क्राइम रिपोर्टर शाहिद खान) : विश्ववेध राज्य पत्रकार संघटनेचे राज्य अध्यक्ष शैलेश पाटील यांच्या हस्ते चित्रनिश पाटील यांची विश्ववेध राज्यपत्रकार संघटनेच्या इलेक्ट्रॉनिक मिडीयाच्या जळगाव जिल्हाअध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.

यावेळी बोलतांना संघटनेचे राज्य अध्यक्ष शैलेश पाटील यांनी म्हटले की, पुढील काळात संघटना मजबूत करण्यासाठी व पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी संघटनेसोबत संघटनेच्या ध्येय धोरणनुसार वाटचाल करालहीच अपेक्षा करतो. आपण पत्रकारिता क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दाखल घेत संघटनेने आपल्यावर विश्वास दाखवत जळगाव जिल्हाअध्यक्ष या पदावर आपली नियुक्ती केली आहे. ती जबाबदारी आपण निश्चितच यशस्वीपणे पार पाडाल.

चित्रनीश मधुकरराव पाटील यांची विश्ववेध राज्य पत्रकार संघटनेच्या इलेक्ट्रॉनिक मिडीयाच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here