अन् मुलांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य !!

प्रचेत फाउंडेशन मार्फत सातपुडा पर्वताच्या कुशीत वसलेल्या महाराष्ट्र व मध्य प्रदेश येथील पाड्यावरील बालकांना कपडे,खाऊ वाटप…..

यावल (प्रतिनिधी) : प्रचेत फाउंडेशन मार्फत दि 17 जुलै रोजी सातपुडा पर्वतरांगेतील गारबर्डी , निमडया , मध्यप्रदेश सीमेतील मांजल , धुपा , हरकुंदीया पाड्यावरील लहान मुले-मुली,तरुण-तरुणी तसेच यांना कपडे व खाऊची वाटप करण्यात आला.यात त्यांना चांगल्या दर्जाचे कपडे तसेच लहान मुलांना सॉक्स वाटप करण्यात आले.सदर वस्तु व फराळ वाटप करतांना त्यांच्या चेहऱ्यावर खरे हास्य फुलतांना पाहीले.

यावेळी प्रचेत फाउंडेशन चे अध्यक्ष चेतन चौधरी , सोशल वर्क स्टुडंट फाउंडेशन चे जिल्हा अध्यक्ष आकाश धनगर , उपाध्यक्ष प्रतीक हरीमकर उपस्थित होते.

या कामी प्रचेत फाउंडेशन चे अध्यक्ष चेतन चौधरी यांच्या नेतृत्त्वात सावदा येथील सामाजिक कार्यकर्ते मोहन महाजन , सागर महाजन , जळगांव विद्यापीठ समाजकार्य विभागाची विद्यार्थिनी श्वेता परदेशी यांचे अनमोल सहकार्य लाभले. त्यांच्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक तर लाभार्थ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here