नवी दिल्ली : कोरोनामुळे परीक्षा रद्द करण्यात आलेल्या आयसीएसई दहावी आणि आयएससी बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. दहावीचा निकाल नववीचे गुण आणि दहावीच्या अंतर्गत गुणांच्या मुल्यांकनावर लावण्यात आला आहे. तर बारावीचा निकाल ११ वी आणि १२ वीच्या अंतर्गत परीक्षेतील गुणांवर आधारित आहे.
दहावीचा निकाल ९९.९८ टक्के, तर बारावीचा निकाल ९९.७६ टक्के इतका लागला आहे. http://www.cisce.orgआणि http://www.results.cisce.orgया दोन संकेतस्थळावर निकाल पाहता येईल.
आयसीएसई दहावीच्या परीक्षेसाठी २ लाख १९ हजार ४९९ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १ लाख १८ हजार ८४६ मुलं, तर १ लाख ६५३ मुली होत्या.दुसरीकडे आयएससी बारावीच्या परीक्षेसाठी ९४ हजार ११ विद्यार्थी बसले होते. त्यापाकी ५० हजार ४५९ मुलं, तर ४३ हजार ५५२ मुली होत्या. महाराष्ट्रात आयसीएसईच्या २३४ शाळा आहेत. या शाळेतील २४ हजार ३५९ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. हे सर्व विद्यार्थी पास झाले आहेत. तर आयएसीच्या एकूण ५३ उच्च माध्यमिक शाळा आहेत. या शाळेतून ३ हजार ४२७ मुलं परीक्षेला बसली होती. त्यापैकी ९९.९४ टक्के मुलं पास झाली आहेत.






