इचलकरंजी (महाराष्ट्र सह संपादक मनोज सोनवले) : काल पासून इचलकरंजी शहरामध्ये पूर परस्थिती उद्भवली असून प्रशासन सह पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी आम्ही कर्तव्यनिष्ठ आहोत. इचलकरंजी मधील पूरग्रस्त भागामधील परिस्थितीची पाहणी केली.
पाण्याची पातळी जरी स्थिर असली तरी सतर्क राहण्याची विनंती भागातील नागरिकांना केली. ही वेळ घाबरून जाण्याची नसून सावधान राहणं गरजेचं आहे.


यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे, नगराध्यक्षा अलका स्वामी वहिनी, नगरसेवक प्रकाश पाटील, अभिजीत रवंदे, दिपक नेरलेकर, सचिन भुते, निखिल जमाले, सलीम ढालाईत, निशिकांत पाटील, युवराज जाधव, युसुफ दुर्ग यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.






