जिल्हास्तरीय ‘फर्स्ट वंडर फायर स्केटर चॅम्पियनशिप’ उत्साहात; ‘जे जे रोलर स्केटिंग अकॅडमी’ने पटकावला अजिंक्यपदाचा बहुमान

स्केटिंग अकॅडमी

कोल्हापूर (प्रतिनिधी रहिम पिंजारी) | स्वराज्य रोलर स्केटिंग अकॅडमी व संलग्न आईस स्केटिंग असोसिएशन कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘फर्स्ट वंडर फायर स्केटर चॅम्पियनशिप २०२६’ या जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेचा थरार नुकताच उचगाव येथे रंगला. ‘इंटरनॅशनल स्कूल, उचगाव’ येथे पार पडलेल्या या भव्य स्पर्धेत कोल्हापूरच्या जयराम जाधव यांच्या ‘जे जे रोलर स्केटिंग अकॅडमी’ने सर्वोत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांकाची चॅम्पियनशिप ट्रॉफी आणि मुख्य बहुमान आपल्या नावावर केला.

या मानाच्या जिल्हास्तरीय स्पर्धेचे उद्घाटन उचगाव ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच मधुकर चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. याप्रसंगी उचगाव ग्रामपंचायतीचे सर्व सन्माननीय सदस्य, सांगली जिल्ह्याचे नगरसेवक आशिष साळुंखे, आणि स्केटिंग क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक सूरज शिंदे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून स्पर्धेची अधिकृत सुरुवात करण्यात आली.

या स्पर्धेत महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाभागातील खेळाडूंनी मोठा सहभाग नोंदवला होता. कोल्हापूर, सांगली, बेळगाव, कर्नाटक, गडहिंग्लज आणि मिरज अशा विविध भागांतील बाल व तरुण स्केटर्सनी यामध्ये अत्यंत उत्साहाने व कौशल्याने सहभाग घेतला.

स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पहिल्या पाच संघांना भव्य चॅम्पियनशिप ट्रॉफी प्रदान करण्यात आली. यात प्रथम क्रमांक: जे जे रोलर स्केटिंग अकॅडमी, कोल्हापूर (जयराम जाधव), द्वितीय क्रमांक: सचिन टीम टॉपर्स, तृतीय क्रमांक: सई स्केटिंग अकॅडमी, सांगली, उत्तेजनार्थ: महात्मा गांधी रोलर स्केटिंग अकॅडमी व एजे रोलर स्केटिंग अकॅडमी, गडहिंग्लज, प्रोत्साहनपर सन्मान: संजय टीम, जमखंडी यांना देण्यात आला.स्केटिंग अकॅडमी

यजमान स्वराज्य रोलर स्केटिंग अकॅडमीच्या खेळाडूंनी देखील स्पर्धेत आपल्या कौशल्याची चुणूक दाखवत घवघवीत यश संपादन केले. विजेत्या सर्व खेळाडूंना मेडल, आकर्षक ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या संघात देवांश चव्हाण, अथर्व चव्हाण, दर्शन निर्मळे, रणविजय चव्हाण, अथर्व जाधव, हर्ष जाधव, आराध्या परब, हर्षल काशीद, प्रज्ञेश शृंगारे, श्लोक हेरलेकर, अभिमन्यू पाटील आणि स्वरा दोडमनी हे खेळाडू होते. या स्पर्धेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ‘स्पेशल चाईल्ड’ गटामध्ये राष्ट्रीय खेळाडू सिद्धार्थ काळे आणि निर्भय जाधव यांनी उत्कृष्ट स्केटिंगचे प्रदर्शन करत उपस्थितांची मने जिंकली आणि स्पर्धेत आपला मोलाचा सहभाग नोंदवला.

या संपूर्ण स्पर्धेचे नेटके आणि शिस्तबद्ध नियोजन स्वराज्य रोलर स्केटिंग अकॅडमीचे अध्यक्ष विजय जाधव, उपाध्यक्ष रोहन माने, खजिनदार नजीर मदार, सदस्य दीपक मसेकर (कृषी अधिकारी), नंदकुमार मजगे आणि सेक्रेटरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. तसेच, एन.आय.एस. आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक व पंच सौ. शुभांगी कांबळे मॅडम यांनी स्पर्धेचे पंच म्हणून बहुमूल्य काम पाहिले. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी स्वराज्य रोलर स्केटिंग अकॅडमीचे सर्व पालक, विद्यार्थी आणि क्रीडाप्रेमींचे मोलाचे योगदान लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here