गुरुपौर्णिमानिमित्ताने शिर्डी येथे आलेल्या राहुरी येथील पालखीचे साईबाबा शिर्डीत स्वागत

शिर्डी (प्रतिनिधी तुषार महाजन) : शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे हे राहुरी,देसवंडी येथील ग्रामस्थांसह दरवर्षी शिर्डी येथे गुरुपौर्णिमे निमित्ताने श्री साईबाबांचे पायी पालखी सोहळ्याचे आयोजन करीत असतात.

याही वर्षी कोरोना संसर्गांमुळे ही पालखी अत्यंत सध्या पद्धतीने व कोरोना नियमांचे पालन करून आज शिर्डीत दाखल झाली यावेळी शिर्डीचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर व शिवसेना नेते कमलाकर कोते यांनी या पालखीचे स्वागत केले. यावेळी श्री खेवरे यांचे समवेत राहुरीचे नगरसेवक मुन्नासेठ तनपुरे,राजूभाऊ गुंजाळ,विजयराव मुथा,अमृतराव उदावंत,यासह अनिल पवार,संतोष जाधव,रवी सोनवणे आदींसह पालखी पदयात्री उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here