साई परिवार सेवाभावी संस्था अंतर्गत गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने अन्नदान

मुंबई (संपादक सुनिल पाटील) : कांदिवली स्थित साई परिवार सेवाभावी संस्था अंतर्गत गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने दोनशेहून अधिक गरजवंत व्यक्तीस अन्नदान करण्यात आले. साई परिवाराचे विश्वस्त श्री मंगेश रासम, अंकुश रासम, श्री वडके तथा इतर पदाधिकारी उपस्थित होते.

गुरुपौर्णिमा निमित्ताने नंदा फाउंडेशनचे अध्यक्ष स्वप्नील वाडेकर यांनी यात सहभाग नोंदविला. सदर संस्था द्वारा कांदिवली बोरिवली परिसरात गत ७५ दिवस अखंडितपणे आहार दानाचा कार्यक्रम चालू असून यामुळे गरजवंतांना मोठ्या प्रमाणावर आहार उपलब्ध होत आहे. केवळ गरीब अनाथ बालके नाही तर व्यवसाय नोकरी गमावलेले तरुण देखील या आहार दानाचा लाभ घेत आहेत. श्री मंगेश रासम व्यक्तीगत रित्या गत दोन महिने या कार्यक्रमाचे आयोजन करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here