चोपडा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कोरोना योध्द्यांचा सन्मान

चोपडा (संदीप ओली) – शुक्रवार दि.31/7/2020 रोजी उपमुख्यमंत्री अजीतदादा पवार यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी युवक कॉग्रेस जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य रविंद्र नानासाहेब पाटील व तालुका युवक अध्यक्ष मनोज युवराज पाटील ,प्रकाश अशोक पाटील,जगदिश श्रावण पाटील,राजेद्र वसंत धनगर,संजय भाऊ बिराडे,गणेश पाटील,सोहम पाटील यांनी तापी परीसरातील दोदंवाडे,तांदलवाडी,निमगव्हान गावातील कोवीड १९ च्या आपत्तीमध्ये आपल्या स्वत:च्या जीवाची पर्वा न करता अापले कौटुंबीक जीवन बाजुला ठेवून समाजावर आलेल्या या महामारीच्या संकटात अहोरात्र मेहनतीने करोनासी दोनहात करत आपले योगदान संपूर्ण देश व राज्य व गाव स्मरणात ठेवला म्हणून राष्र्टवादी युवक तालुका अध्यक्ष मनोज युवराज पाटील यांनी कोरोना योध्दा म्हणून तापी परीसरातील सरपंच,पोलीस पाटील,अंगनवाडी सेविका,मदतनिस,ग्रामपंचायत शिपाई,ग्रामसभेतील सदस्य,यांना प्रशस्तीपत्र व गुलाब पुष्प देउन सन्मानित केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here