शास्त्रज्ञ दीपक पिंजारी , अॅड . हणमंतराव वाक्षे यांची शरद पवार यांचेकडे मागणी
आटपाडी (प्रतिनिधी ) – आटपाडीचे सादिक पापामियाँ खाटीक यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून काम करण्याची संधी देवून
माणदेशासह महाराष्ट्रातल्या लाखो उपेक्षित, वंचित, मागास, अल्पसंख्याकांना न्याय दिला जावा अशी मागणी राष्ट्रीय सायन्स अकादमीचे सदस्य , शास्त्रज्ञ प्रा.डॉ.दीपक विठ्ठल पिंजारी आणि मुंबई उच्च न्यायालयात वकीली करणारे अॅड. हणमंतराव गोविंद वाक्षे ( दोघेही रा. निंबवडे ) यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांना पाठविलेल्या खास पत्राद्वारे केली आहे .
या पत्राच्या प्रति उपमुख्यमंत्री अजितदादा पवार , राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील, अल्पसंख्याक कार्य मंत्री नबाब मलीक, ग्रामीण विकास मंत्री हसन मुश्रीफ,खासदार सुप्रियाताई सुळे ,खासदार फौजिया खान, राष्ट्रवादी कॉंग्रेस अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीरअहमद विद्रोही यांना पाठविण्यात आल्या आहेत .
सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील १३ दुष्काळी तालुक्यांच्या, क्रांतीवीर नागनाथआण्णा नायकवडी यांच्या नेतृत्वाखालील पाणी चळवळीत प्रारंभापासून पायाचा दगड बनलेल्या ध्येयवेड्या सादिक खाटीक यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून काम करण्यास संधी दयावी अशी विनंती करून शास्त्रज्ञ डॉ. प्रा दीपक पिंजारी आणि अॅड. हणमंतराव वाक्षे यांनी , यापूर्वी सादिक खाटीक यांना विधान परिषदेवर संधी द्या अशी विनंती करणारी पत्रे अनेक मान्यवर महोदयांनी आपणांकडे पाठविली आहेत. त्यामध्ये माजी केद्रीय मंत्री महोदय , २ विद्यमान आमदार महोदय , ४ माजी आमदार महोदय , पत्रकार संघटनेचे पदाधिकारी , मोठ्या साखर कारखान्याचे सर्वेसर्वा , कोल्हापूर, सोलापूर आणि सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालीकेचे आजी माजी ५ महापौर महोदय ,कोल्हापूरातल्या दिग्गज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष , विविध ७ दैनिकांचे संपादक महोदय , माजी आमदार महोदयांचे नातलग ,राष्ट्रवादीचे प्रदेश प्रतिनिधी , सेवानिवृत कार्यकारी अभियंता आणि शेकडो युवकांचा आयडॉल असणाऱ्या युवक नेत्याचा समावेश असल्याचा उल्लेख पवार साहेबांना पाठविलेल्या पत्रात केला आहे.
१९८४ पासून विविध वृतपत्रांच्या च्या माध्यमातून शेकडो विषयावर आवाज उठवित पाणी प्रश्नाच्या सोडवणूकीसाठी सक्रीय सहभागातून ,लिखाण, भाषणे, आंदोलने,परिषदांमधून गर्जत राहीलेल्या सादिक खाटीक यांना नेहमीच त्यांच्या जात,धर्म,गरीबी,आणि राजकीय नेत्यांच्या, गरजेपुरते वापरा अन् वापरून झाल्यावर फेकून द्या. या मतलबी भूमिकेने उपेक्षित ठेवले गेले. ग्रामपंचायती पासून आमदारकी पर्यत अनेक यशाची शिखरे चढविण्यात अनेकांना सहाय्यभूत ठरलेल्या सादिक खाटीक यांना ” त्या ” प्रत्येकाने वाऱ्यावर सोडण्याचे काम केले आहे . राज्यातल्या शेकडो प्रश्नांची जाण असणाऱ्या राज्यभर आपल्या लेखणी,वाणी, संघटन कौशल्याद्वारे कार्यरत राहीलेल्या सादिक खाटीक यांच्या माध्यमातून लाखो उपेक्षिताना खरेखुरे प्रतिनिधीत्व मिळणार आहे.महाराष्ट्र राज्यातील मुस्लीम खाटीक समाज एकत्र आणण्याचे आणि त्याला आपल्या हक्काप्रती जागृत करण्याचे काम त्यांनी १५ वर्षापासून केले आहे . त्यातून राज्यभर एक संघटनही आकाराला आलेले आहे . त्यांच्या कार्याची दखल घेऊन आपल्या पक्षाने त्यांना महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणीवर संधी दिली आहे. पश्चिम महाराष्ट्रात पुणे, अहमदनगर,सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुस्लीम आणि इतर अल्पसंख्य समाज मोठ्या प्रमाणावर आहे . गत ७० वर्षाच्या सर्व निवडणूकांचा विचार करता या अल्पसंख्य नेतृत्वाला अत्यंत तुरळक प्रतिनिधीत्व मिळाले आहे. प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक टर्मला १ आमदार धरला तर अल्पसंख्य समाजाचे किमान ६० आमदार व्हायला हवे होते . तथापि वस्तुस्थिती काय आहे हे आपल्या लक्षात येईलच असे नमुद करून पिंजारी – वाक्षे द्वयांनी , सादिक खाटीक यांना आपण आपल्या पक्षाचे वतीने आमदार केल्यास प्रथमतः आटपाडी तालुक्याला काँग्रेस विचारधारेतून यथायोग्य न्याय मिळेल .माणदेशाचा सुपुत्र म्हणनच ३२ वर्षे झगडत आलेल्या सादिक खाटीक यांच्यामुळे माणदेशाला खरेखुरे सदैव उपलब्ध होवू शकणारे हक्काचे प्रतिनिधीत्व लाभेल . राज्यातल्याच नव्हे तर संपूर्ण देशातल्या काही गावांचा अपवाद वगळता लाखो गावात आढळणारे सर्व धर्मीय खाटीक बांधवांना त्यांचा खराखुरा भाऊ लोकप्रतिनिधीच्या रुपात मिळू शकेल . दुष्काळी आटपाडी तालुक्याचे , माणदेश प्रदेशाचे आणि सामान्य मुस्लीम खाटीक मुस्लीम मागासांचे राज्यभराचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या सादिक खाटीक यांना आपण आमदार बनवावे हीच आपल्या ठायी आम्हां उच्च पदस्थ दोन धनगर बांधवांची प्रांजळ आग्रही मागणी राहणार आहे असे त्यांनी म्हटले आहे .
सादिक खाटीक हे पत्रपंडीत पां .वा .गाडगीळ या राज्यातील पत्रकारीतेतील मानाच्या पुरस्कारासह अनेक पुरस्कार , माणपत्राने सन्मानीत आहेत . त्यांनी आपल्या ३२ वर्षाच्या लक्षवेधी पत्रकारीतेतून राज्यभराचे नेहमीच लक्ष वेधून घेतले आहे . महाकवी ,थोर साहित्यीक ग .दि.माडगूळकर यांचे शासकीय स्मारक त्यांच्या जन्मगांवी उभारण्याच्या शासनाच्या समितीचे ते सदस्य होते .थोर साहित्यीक स्वर्गीय शिवाजी सावंत , अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष स्व .ना .सं .इनामदार , गदिमांचे सुपुत्र द्वय स्व .श्रीधर माडगूळकर , श्री .आनंद माडगूळकर , चित्रपट दिग्दर्शक राम गबाले साहेब , विविध मोठया दैनिकांचे संपादक राहीलेले ज्येष्ट पत्रकार शरद कारखानीस , समितीतील राज्याचे तत्कालीन विविध कॅबिनेट मंत्री , तत्कालीन आमदार अशा मान्यवरांच्या बरोबरीने सादिक खाटीक यांनी या समितीत काम केले आहे . चमकदार, लक्षवेधी कामगिरीतून या समितीमध्ये त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते . गदिमांचे राष्ट्रीय स्मारक ही कल्पना त्यांचीच होती .थोर साहित्यीक व्यंकटेशतात्या माडगूळकर , डॉ . बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा कुलगुरू शंकरराव खरात , थोर साहित्यीक ना . सं . इनामदार , औंध संस्थानचे अधिपती आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब उर्फ भवानराव पंतप्रतिनिधी या आटपाडीशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबधीत पाच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांबद्दल, अभिजन वर्गात फारशी कोणी कळकळ दाखविली नाही . मात्र सादिक खाटीक यांनी, शेतकरी साहीत्य इर्जिक , कथाकथन महोत्सव , राजारामबापू पाटील शब्द सोहळा , विविध गावची कवी संमेलने, साहित्य संमेलने, माणदेश ज्ञानपीठची दहिवडी, सांगोला येथील मोठी संमेलने या माध्यमातून गावोगावच्या सर्वसामान्यांना बरोबर घेऊन, या साहित्यीकांच्या कार्याचा जागर चालु ठेवला .परिसरातल्या संशोधन कार्यात सुध्दा सादिक खाटीक यांचे मोलाचे योगदान असून प्राच्य विदया पंडीत , ख्यातनाम विचारवंत स्वर्गीय रा . चिं.ढेरे लिखित शिखर शिंगणापुरचा शंभू महादेव या संशोधन ग्रंथात सादिक खाटीक यांच्या करगणीतील लखमेश्वर उर्फ श्रीराम मंदिरावरील दै . तरूण भारत मधील लेखाचा संदर्भ आहे . याच ग्रंथात तीन चार ठिकाणी ढेरे यांनी त्यांचा उल्लेख केला आहे . छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुळाच्या दृष्टीने काही मौलीक अभ्यास ढेरे यांनी या ग्रंथात मांडला आहे . भविष्यातही राज्याला आणि देशाला मार्गदर्शक ठरेल अशा ग्रंथात सादिक खाटीक यांच्या लिखाणाच्या संदर्भ असल्याने सादिक खाटीक यांचे कार्य अधोरेखित होते .
आटपाडीचा आमदार झाला पाहीजे , या १९९५ च्या विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामातील सादिक खाटीक यांचे योगदान हजारोंना आजही स्मरते .
एबीपी माझा मराठी न्युज चॅनेल मुंबईचे संपादक श्री . राजीव खांडेकर साहेब , ख्यातनाम साहित्यीका प्रा .डॉ .स्वाती शिदे – पवार विटा ( खानापूर ), जत ( सांगली ) चे माजी आमदार जयंत सोहनी साहेब , माजी उपमुख्यमंत्री कै .आर .आर . पाटील आबासाहेबाचे सख्ये मेव्हणे , माजी न्यायाधीस अॅड . एम . डी . देशमुख साहेब कोल्हापूर , अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष , बेळगांव तरूण भारतचे उपसंपादक शिवराज काटकर सांगली , बेळगांव हलकर्णी येथे वरिष्ठ प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले प्रा . नामदेव जावीर गोमेवाडीकर ,मानचिन्ह दिवाळी अंकाचे संपादक प्रा .सुरेश देशपांडे पुणे, मायणी ( सातारा ) महाविदयालयाचे प्राचार्य प्रा .डॉ . सयाजीराजे मोकाशी , जत महाविदयालयाचे माजी प्राचार्य , ज्येष्ट साहित्यीक श्रीपाद जोशी सर जत, महाराणी अहिल्यादेवी होळकर शिक्षण संस्था सांगलीचे चेअरमन ,माजी प्राचार्य आर .एस. चोपडे सर सांगली , सुप्रसिद्ध ग्रामीण, बाल आणि निसर्ग कवी श्री . सुभाष कवडे सर भिलवडी ,सौदी अरेबिया दमाम येथील हिताची गुप कंपनीतील क्वालिटी मॅनेजर , फिरोज जानमोहम्मद शेख पुणे , सांगोला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य प्रा .डॉ .कृष्णा इंगोले सर , ज्येष्ट पत्रकार संजीव शाळगांवकर ( पुणे ) , महाराष्ट्र टाईम्सचे पत्रकार नामदेवराव भोसले मिरज , प्रसिध्द वक्ते दीपक रणदिवे सर दिघंची , पत्रकार संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव खटके सर लिंगीवरे , सेवानिवृत मुख्याधिपीका कमल कुलकर्णी तथा सौ . राधिका जोशी मॅडम पुणे इत्यादी मान्यवरांनी सादिक खाटीक यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर लिहीलेल्या हृदयस्पर्शी , वास्तव आणि लक्षवेधी लेखातून सादिक खाटीक यांच्या कार्याचा उस्फुर्तपणे गौरव केला आहे ,वर उल्लेख केल्याप्रमाणे सर्वसामान्यांपासून असामान्यांपर्यत निरपेक्षपणाने सादिक खाटीक ३६ वर्षे झटले आहेत . त्यांच्या कार्याची दखल आपल्या सारखे रत्नपारखी नेतृत्वच घेऊ शकते , आपण ती घ्याल अशी अपेक्षा शास्त्रज्ञ प्रा.डॉ. दीपक पिंजारी आणि अॅड . हणमंतराव वाक्षे यांनी शेवटी या पत्रात व्यक्त केली आहे .
___________
शास्त्रज्ञ प्रा . डॉ. दिपक विठ्ठल पिंजारी
निंबवडे ता. आटपाडी जि.सांगली.
* रसायन अभियांत्रिकी मध्ये (Chemical Engineering) डॉक्टरेट (पीएचडी).
*अमेरिकेतील जॉर्जिया इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (Georgia Institute of Technology) येथे अमेरिकन सरकारने फुलब्राइट फेलोशिप दिली.
* सध्या ते भारत सरकारचे प्राध्यापक आणि संशोधक म्हणून मुंबई येथे नॅशनल सेंटर फॉर नैनोसायन्स अँड नैनोटेक्नोलॉजी येथे काम करतात.
*त्यांना ब्रिक्स युवा शास्त्रज्ञ, जागतिक युवा शास्त्रज्ञ पुरस्कार, चीन सरकारचे संशोधनासाठी पुरस्कार, राष्ट्रीय सायन्स अकादमीचे सदस्यत्व इत्यादी पुरस्कार मिळाले आहेत.
_____________
अॅडव्होकेट हणमंतराव गोविंद वाक्षे.
मु.पो. निंबवडे ता.आटपाडी जि. सांगली.
*मुंबई उच्च न्यायालय मुंबई येथे सन २००२ पासून वकीली करत आहेत.
*सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या दुर्बल,उपेक्षित,वंचित,मागास, अल्पसंख्य घटकांसाठी सतत कार्यरत.
*अंभग फाऊंडेशनच्या माध्यमातून राज्यभर सर्वसमावेशक कार्याची जोपासणा.
*वारकरी संप्रदाय आणि संत महात्म्यांच्या विचारधारेला प्रेरक अध्यात्मीक कार्याला वृद्धींगत करण्याची मुख्य भूमिका त्यांची राहीली आहे .







