नवचेतना युवा मंच व इकॉलॉगिक फौंडेशनच्यावतीने नानेगाव येथे वृक्षारोपण

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : नवचेतना युवा मंच व ग्रामीण विकास संस्था पुणे व इकॉलॉगिक फौंडेशन कर्वे नगर पुणे यांच्या वतीने शनिवारी (२४ जुलै) नानेगाव (ता. मुळशी) येथे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यासोबतच यावेळी शेतकऱ्यांना परसबाग बियाणे वाटप करण्यात आले.

यावेळी पाणी पुरवठा व स्वच्छता या विषयावर डॉक्टरेट मिळवलेले सीताराम शरणागत, वीज महामंडळ नियंत्रण समितीच्या सदस्यपदी निवड झालेले महादेव गोळे, सार्वजनिक वितरण व व्यवस्था समितीच्या सदस्यपदी निवड झालेले भाऊ केदारी, कोथरूड राष्ट्रवादी काँग्रेसच्या लीगल सेलचा अध्यक्षपदी निवड झालेले अँड अनिल भिलारे, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड झालेले सुनील कडू यांचा या वेळी सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास पत्रकार सचिन वाघमारे, कुळे गावचे माजी सरपंच मनोज साठे, नवचेतना युवा मंचचे अध्यक्ष जयवंत दहिभाते, उद्योजक अजित कामलापूरकर, विनायक गार्डे, सुजाता कोडग, राहुल भिंगारे ,सुनील उपाध्ये, किशोर सावजी, महादेव पुजारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार नानेगावच्या सरपंच कमल बाळू कोंढाळकर यांनी मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अँड. दत्तात्रय दहिभाते यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here