राजधानी दिल्लीतील महाराष्ट्र सदनास आग

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात आज सकाळी ही आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशामक दलाच्या ४ गाड्या आल्या असून लगेचच आगीवर नियंत्रण मिळविले आहे. राज्यपालांसाठी आरक्षित असलेल्या कक्षाला ही आग लागली होती. शॉर्ट सक्रिटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

या आगीमध्ये सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झाली नाही. तसेच आगीमुळे झालेल्या इतर नुकसानीची माहिती समोर आली नाही. आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशामक दलाच्या चार गाड्या घटनास्थळी तातडीने रवाना झाल्या असून, आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असल्याचे सांगितले जात आहेत. तसेच या घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलिसांनीही घटनास्थळाकडे धाव घेतल्याचे समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here