प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री ‘जयंती’ यांचे निधन

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय जेष्ठ अभिनेत्री ‘जयंती’ यांचं (दि. २६) निधन झालं आहे. जयंती ह्या 76 वर्षांच्या होत्या. एक अत्यंत लोकप्रिय आणि नामांकित अभिनेत्री म्हणून जयंती यांना ओळखलं जात होत. बंगळुरूमधील आपल्या राहत्या घरी झोपेतच त्यांची प्राणज्योत मालवली.

जयंती यांच्या निधनाची दुःखद बातमी त्यांचा मुलगा कृष्ण कुमार यांनी त्यांच्या चाहत्यांना दिली. त्यांच्या निधनानं सिनेसृष्टीला मोठा झटका बसला असून, अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाद्वारे जयंती यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

जयंती यांनी आपल्या करिअरमध्ये १०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम होतं. १९६० ते ८० ही तीन दशकं त्यांनी आपल्या जबरदस्त अभिनयाच्या जोरावर गाजवली होती. त्यांनी तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि काही बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here