नगरपरिषदेच्यावतीने जनजागृती व स्वच्छता मोहिम राबविणार – नगराध्यक्षा अ‍ॅड. सौ. अलका स्वामी

इचलकरंजी (महाराष्ट्र उपसंपादक मनोज सोनवले) : महापुराचे पाणी ओसरल्यानंतर साथीच्या आजारांचा फैलाव होऊ नये तो रोखण्यासाठी नगरपरिषदेच्यावतीने जनजागृती व स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्षा अ‍ॅड. सौ. अलका स्वामी यांनी दिली.

शहरातील निर्माण झालेल्या महापूरामुळे गावभाग व मळेभागातील पूरग्रस्त नागरिकांचे निवारा छावणीत स्थलांतर करण्यात आले आहे. सोमवार पासून पूराचे पाणी संथगतीने ओसरु लागले आहे. त्यामुळे जसजसे पूराचे पाणी ओसरेल त्यानुसार त्या त्या भागात तातडीने स्वच्छता मोहिम आणि आरोग्यसेवा पुरविण्यासंदर्भात नगराध्यक्षा अ‍ॅड. सौ. अलका स्वामी यांनी सोमवारी तातडीने आरोग्य व पाणी पुरवठा विभागातील प्रमुखांची बैठक घेतली. यावेळी मुख्यधिकारी डाॕ प्रदिप ठेंगल सह आरोग्य सभापती संजय केंगार व पाणी पुरवठा सभापती दीपक सुर्वे उपस्थित होते.

पूराचे पाणी ओसरल्यानंतर साथीचे आाजार पसरु नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपचारासाठी आरोग्य यंत्रणेने सतर्क रहावे. पूरग्रस्त भागात साथरोगांवरील औषधांचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्यावा. डासांची उत्पत्ती रोखण्याकरीता धूर आणि औषध फवारणी करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. त्याचबरोबर पूर ओसरल्यानंतर त्या त्या भागात पाण्याचेही योग्य पध्दतीने नियोजन करावे. मजरेवाडी येथील उपसा केंद्रातून जितक्या लवकर पाणी पुरवठा सुरु करता येईल त्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना केल्या.

यावेळी मुख्यधिकारी डॉ. प्रदिप ठेंगल आरोग्य सभापती संजय केंगार, पाणी पुरवठा सभापती दीपक सुर्वे, जेष्ठ नगरसेवक सागर चाळके, बाबासो कोरे जलआभियंता सुशाष देशपांडे बाजीराव कांबळे आरोग्य विभाग प्रमुख विश्वास हेगडे, विजय पाटील, शितल पाटील,नितीन सरगर यांच्यासह आरोग्य व पाणी पुरवठा विभागातील अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here