मुंबई हायकोर्टाने केला पूनम पांडे, शर्लिन चोप्राचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणात नवीन खुलासे होत आहेत. यासह या प्रकरणात आणखी बरीच नावेही जोडली जात आहेत. गुन्हे शाखेच्या रडारवर असलेल्या मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडे आणि शर्लिन चोप्रा यांनी अटक पूर्व जामिनासाठी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. आज मुंबई हायकोर्टाने या दोघींना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

सोमवारी मुंबई गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने या प्रकरणात अभिनेत्री-मॉडेल शर्लिन चोप्रा हिला समन्स बजावले होते. मंगळवारी सकाळी ११ वाजता पॉर्नोग्राफीप्रकरणी तिचा जबाब नोंदवण्यासाठी गुन्हे शाखेने शर्लिनला बोलावले होते. त्यामुळे अभिनेत्री पूनम पांडे आणि शर्लिन चोप्रा यांनी अटक पूर्व जामिनासाठी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. आज मुंबई हायकोर्टाने या दोघींना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. हायकोर्टाने असे म्हटले आहे की, २० सप्टेंबर २०२१ पर्यंत या दोघींवर कोणतीही कठोर कारवाई केली जाणार नाही.

यापूर्वी रविवारी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने अभिनेत्री-मॉडेल गहाना वसिष्ठ हिच्यासह तीन जणांना चौकशीसाठी बोलावले होते. याआधी शुक्रवारी राज कुंद्राची पत्नी अभिनेत्री शिल्पा शेट्टीवरही गुन्हे शाखेने सहा तास चौकशी केली. दररोज या प्रकरणात अनेक मोठे खुलासे होत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here