सोज्वळ, संवेदनशील भूमिका साकारणाऱ्या ऐश्वर्या नारकर यांचे हटके फोटोशूट

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : आजवर सोज्वळ, संवेदनशील आणि प्रेमळ भूमिकांमुळे प्रेक्षकांना माहिती असणाऱ्या अभिनेत्री ऐश्वर्या नारकर आपल्या नव्या फोटोशूटमधील फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या नव्या फोटोशुटमध्ये त्या हटके पोज देताना दिसल्या आहेत.

त्यांचे इन्स्टाग्राम अकाऊंट पाहता. बहुतांश फोटो हे साडी या पारंपारिक वेशभुषेतील आहेत. नेहमी मराठमोठा साज श्रृंगार करून साडीमध्ये फोटोशुट करणाऱ्या ऐश्वर्या नारकर यांच्या या हटके फोटोशूटमध्ये त्यांचे वयाच्या ५१व्या वर्षीही तरुणींना लाजवेल असं सौंदर्य पाहायला मिळते.

शेअर केलेल्या फोटोत त्यांचे सौंदर्य आणखी खुलून दिसत आहे. त्यांच्या नव्या फोटोशुटवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे. पहिल्यांदाच त्यांनी असे हटके फोटोशूट केल्याने सोशल मीडियावर याची अधिक चर्चा होत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here