नाशिक (विशेष प्रतिनिधी) – टेंभी नाका सामाजिक बहुद्वेशीय संस्था व मित्र मंडळातर्फे ड़ीजीपीनगर-२ येथे सलग ४ दिवस सकाळी 8
ते 10 दरम्यान प्रती दिन 350 कप आयुष काढ्याचे मोफत वितरण करण्यात आले.
कोरोना महामारीपासून लोकांचा बचाव व्हावा आणि त्यांच्यातील प्रतिकारशक्ती वाढ़ावी या उद्देशाने टेंभी नाका सामाजिक बहु उद्देशीय संस्था व मित्र मंडळ यांच्यावतीने स्थानिक प्रशासनास साथ देण्यासाठी जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. डीजीपीनगर -२ परिसरात आणि विशेषतः कोरोनाचे रुग्ण आढळले त्या परिसरात जातीने जंतूनाशक फवारणीही करण्यात आली.
मंडळातर्फे रक्तदान शिबिर घेण्यात आले तसेच परिसरात आर्सेनिक अल्बम ३०गोळ्यांचे सुमारे 1000 लोकांना वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे गेल्या 4 दिवसांपासून आयुष काढ्याचे मोफत वितरणही या परिसरात करण्यात आले, असे मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रसाद ठाकरे यांनी सांगितले.आमची संस्था कोविड 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सातत्याने विविध
उपक्रम राबवेल,असेही त्यांनी पुढे सांगितले. कोरोनावर मात करण्यासाठी पोलिस, डॉक्टर्स,परिचारिका,सफाई कामगार आपला जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावित आहेत.आपण सुद्धा त्यांना सहकार्य केलं पाहिजे,असेही त्यांनी नमूद केले.काढ़ा वाटपाच्यावेळी आमोल शेळके, श्रीकांत लहामगे, शिवम शिंपी आदींचे सहकार्य लाभले.संस्थेचे सदस्य सचिन भोर, श्रेयस धात्रक , उन्मेष तळेले, तन्मय गांगुर्डे, दीपक देवरे, सौरभ खांबायते, रोहित चौधरी, अमित घरटे , रितेश हिरे यांचाही यात मोठा सहभाग होता.







