वर्धा (प्रतिनिधी) – आज हिंगणघाट येथे नामदार श्री सुनीलजी केदार साहेब यांना वर्धा जिल्हा खाजगी प्राथमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष यशवंत गडवार , कोषाध्यक्ष श्री दिलीप देवतळे व कुमारी दिपाली थूल आणि कार्यकारणी सदस्य श्री सुदामजी झोटिंग ,संजय वंजारी ,मारोती वाघमारे यांच्यासह चुनीलाल कटारिया प्राथमिक विद्यालयातील शिक्षक श्री दिनेश मुडे ,कांचन शिंगरु , रत्नमाला चिमलवार , नीता मनोज व परिश्रीत ढगे या सर्वांच्या उपस्थितीत बँक ऑफ इंडिया हिंगणघाट येथील अधिकारी अधिक्षक वेतन पथक कार्यालयाकडून प्राप्त मंजुरीच्या पगाराच्या हार्डकॉपी वर शिक्षकांचे पगार न जमा करता चेक ची मागणी करतात वर्धा जिल्ह्यातील इतर कोणत्याही शाखेमध्ये संबंधित शाळेला चेकची मागणी न करता केवळ वेतन पथक कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या अधीक्षकांच्या स्वाक्षरीच्या हार्ड कॉपी वरच वेतन जमा केले जाते मात्र वर्धा जिल्ह्यात हिंगणघाटची शाखा यासाठी अपवाद ठरत आहेत याबाबतचे निवेदन देण्यासाठी आज वरील सर्व एकत्रित आले होते .








